एअरसेल-मॅक्सिसप्रकरण ; चिदंबरम यांच्या जामिनाला 'ईडी'चा विरोध

वृत्तसंस्था
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली : एअरसेल-मॅक्सिस प्रकरणामध्ये माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अंतिम जामिन याचिकेला विरोध करत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) न्यायालयात याबाबत आपले मत व्यक्त केले. 'ईडी'ने सांगितले, की ताब्यात घेऊन चौकशी करण्याची गरज आहे. चिदंबरम यांना जामिन दिला गेल्यास चौकशीमध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे.

एअरसेल-मॅक्सिसप्रकरणी चिदंबरम यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. याबाबत विशेष न्यायाधीश ओ. पी. सैनी यांनी आरोपपत्रावर विचार करण्यासाठी 26 नोव्हेंबरची तारीख निश्चित करण्यात आली. याप्रकरणी 'ईडी'ने पहिले आरोपपत्र पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्याविरोधात दाखल केले होते. त्यानंतर आणखी एक आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

याप्रकरणी नऊ आरोपींच्या नावांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये चिदंबरम, एस. भास्कररन (कार्ती यांचे सीए), व्ही. श्रीनिवासन (एअरसेलचे माजी सीईओ) यांच्याही नावांचा समावेश आहे. 

Web Title: ED Files Reply Opposing Anticipatory Bail Plea Filed By P Chidambaram In The Aircel Maxis Case