काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अडचणीत; 'ईडी'कडून तिसऱ्यांदा चौकशी

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 जुलै 2020

27, 30 जूनलाही चौकशी

- दोनदा समन्स

नवी दिल्ली : संदेसरा ब्रदर्स संबंधित कथित बँक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या अडचणीत वाढ होत आहे. अहमद पटेल यांच्या घरी सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) अधिकारी चौकशीसाठी गेले होते. सकाळी साडेदहाच्या सुमारास हे पथक दाखल झाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार म्हणूनही अहमद पटेल यांची ओळख आहे. आता त्यांचे नाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीसाठी घेतले गेले आहे. संदेसरा ब्रदर्सचे आर्थिक गैरव्यवहार प्रकरण समोर आले होते. यामध्ये जवळपास 5 हजार कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे समोर आले. त्यानुसार आता त्यासंबंधी अहमद पटेल यांची चौकशी केली जात आहे. त्यानुसार ईडीचे पथक त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहे.

ED files first charge sheet

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'ईडी'चे तीन सदस्यीय पथक पटेल यांच्या दिल्लीतील निवासस्थानी चौकशीसाठी गेल्याची माहिती दिली जात आहे. आता पटेल यांचा जबाब आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात (पीएमएलए) नोंद करण्यात येणार आहे. 

एकाच आठवड्यात तिसऱ्यांदा चौकशी

अहमद पटेल यांची एकाच आठवड्यात तिसऱ्यांदा चौकशी झाल्याने राजकीय स्तरावर एकच चर्चा आहे. यापूर्वी 27 जूनला अहमद पटेल यांच्या घरी ईडीचे पथक दाखल झाले होते. त्यानंतर 30 जूनलाही ईडीकडून चौकशी करण्यात आली होती.  

दोनदा समन्स

अहमद पटेल यांना चौकशीसाठी ईडीकडून दोनदा समन्स बजावण्यात आले होते. मात्र, त्यांचे वय जास्त असल्याने घरी राहण्याच्या सूचनेमुळे ते घरीच होते. 

अखेर ईडी घरी

अहमद पटेल हे स्वत: ईडी कार्यालयात चौकशीसाठी येऊ शकत नसल्याने ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी येणार होते. त्यानंतर आता हे पथक पटेल यांच्या घरी आले आहे. 

Congress

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या नियमावलीनुसार घरीच

अहमद पटेल यांना सक्तवसुली संचालनालय कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी दोनदा समन्स बजावण्यात आले होते. मात्र, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांनी घरातच राहावे, अशा सूचना असल्याने ते घरीच होते. त्यामुळे त्यांच्या घरी आता ईडी दाखल झाली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ED questions Congress Leader Ahmed Patel for the third time in PMLA case