मिशेलच्या चौकशीत 'मिसेस गांधीं'चा उल्लेख 

वृत्तसंस्था
रविवार, 30 डिसेंबर 2018

नामोल्लेख व मिशेलचे मौन 
या गैरव्यवहाराच्या सुनावणीदरम्यान दिल्लीच्या पतियाळा हाउस न्यायालयात तपास संस्थांतर्फे मिशेलच्या कबुलीजबाबाची माहिती न्यायालयास दिली जात होती तेव्हा मिशेल हा स्वतः न्यायालयातच उपस्थित होता. सूत्रांनी सांगितले, की "गांधी', "सन ऑफ इटालियन लेडी, हू कॅन बी फ्यूचर प्राईम मिनिस्टर', "बिग मॅन', "आर' असे त्याने स्पष्ट सांगितल्याचा "ईडी'कडून जाहीर उल्लेख झाला तो त्यानेही ऐकला. पण त्याने कसलाही प्रतिवाद केला नाही वा आपण तसे बोललो नसल्याचे म्हटले नाही. याशिवाय त्याने "आर' नावाचा बडा माणूस असाही एक उल्लेख केला आहे. हा "आर' कोण हे खणून काढण्यासाठी तपास संस्थांनी मिशेलची कोठडी आठ दिवसांसाठी वाढवून मागितली व न्यायालयाने सात दिवसांची कोठडी मंजूर केली. मिशेलने "गांधी' व "आर' ही नावे कोणाच्या व कोणत्या संदर्भात घेतली याची उकल "ईडी'ला अद्याप झालेली नाही, असे सांगण्यात आले. 

नवी दिल्ली : ऑगस्टा वेस्टलॅंड हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहार प्रकरणातील मध्यस्थ ख्रिस्तीयन मिशेल याला वकिलांना सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) कोठडीत भेटण्यावर दिल्ली न्यायालयाने शनिवारी निर्बंध घातले. दरम्यान, 27 डिसेंबर रोजी केलेल्या चौकशीत मिशेलने "मिसेस गांधी' यांचा उल्लेख केल्याची माहिती "ईडी'ने न्यायालयात दिली. तसेच, "इटालियन महिलेचा मुलगा' आणि तो कसा देशाचा पुढील पंतप्रधान होणार आहे, याचा उल्लेखही त्याने केल्याचा दावा "ईडी'ने केला आहे. 

"मिसेस गांधीं'बाबतचे प्रश्‍न कसे टाळावेत, याबाबत मिशेल हा वकिलांना चिठ्ठ्या पाठवून सल्ला घेतो आणि त्याला कायद्याची मदत घेण्याबाबत दिलेल्या सवलतीचा गैरफायदा घेतो, अशी तक्रार "ईडी'ने न्यायालयापुढे केल्यावर न्यायालयाने मिशेलवर निर्बंध घातले. मिशेलला त्याचे वकील बाहेरून पढवत असल्यामुळे तो कोठडीत असताना त्याला वकिलांची भेट घेण्यावर बंदी घालावी, अशी मागणीही "ईडी'ने केली आहे. 

संस्थेने मिशेलची 27 डिसेंबर रोजी चौकशी केली तेव्हा त्याने "मिसेस गांधी' यांचा उल्लेख केला, असे "ईडी'ने न्यायालयात सांगितले. मिशेलची वैद्यकीय तपासणी सुरू असताना त्याने त्याचे वकील अल्जोक जोसेफ यांच्याकडे एक फोल्डर दिल्याचे दिसले. त्या फोल्डरची तपासणी केल्यावर त्यात "मिसेस गांधीं'बाबतच्या प्रश्‍नांची तयारी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या संदर्भात पुरावे नष्ट करण्याचा किंवा त्यात बदल करण्याचा हेतू स्पष्ट असल्याचे "ईडी'ने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. आरोपी त्याला दिलेल्या सवलतीचा गैरफायदा घेत असून, ती त्वरित बंद करावी, अशी मागणी "ईडी'ने केली. 

"ईडी'चे म्हणणे ऐकल्यावर न्यायालयाने मिशेलवर निर्बंध घातले. त्यानुसार, बचाव पक्षाचे तीन वकील त्याला एकावेळी एकच या पद्धतीने भेटू शकतील. या दोघांमध्ये पुरेसे अंतर असेल आणि सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत फक्त 15 मिनिटेच ही भेट होईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. सुटीच्या काळातील न्या. चंद्रशेखर यांनी हा आदेश देतानाच मिशेलच्या "ईडी' कोठडीत सात दिवसांची वाढही केली. 

नामोल्लेख व मिशेलचे मौन 
या गैरव्यवहाराच्या सुनावणीदरम्यान दिल्लीच्या पतियाळा हाउस न्यायालयात तपास संस्थांतर्फे मिशेलच्या कबुलीजबाबाची माहिती न्यायालयास दिली जात होती तेव्हा मिशेल हा स्वतः न्यायालयातच उपस्थित होता. सूत्रांनी सांगितले, की "गांधी', "सन ऑफ इटालियन लेडी, हू कॅन बी फ्यूचर प्राईम मिनिस्टर', "बिग मॅन', "आर' असे त्याने स्पष्ट सांगितल्याचा "ईडी'कडून जाहीर उल्लेख झाला तो त्यानेही ऐकला. पण त्याने कसलाही प्रतिवाद केला नाही वा आपण तसे बोललो नसल्याचे म्हटले नाही. याशिवाय त्याने "आर' नावाचा बडा माणूस असाही एक उल्लेख केला आहे. हा "आर' कोण हे खणून काढण्यासाठी तपास संस्थांनी मिशेलची कोठडी आठ दिवसांसाठी वाढवून मागितली व न्यायालयाने सात दिवसांची कोठडी मंजूर केली. मिशेलने "गांधी' व "आर' ही नावे कोणाच्या व कोणत्या संदर्भात घेतली याची उकल "ईडी'ला अद्याप झालेली नाही, असे सांगण्यात आले. 

Web Title: ED says Christian Michel referred to ‘Mrs Gandhi’, claims plot to tamper with evidence