
फ्रान्समध्ये जप्त करण्यात आलेल्या संपत्तीची किंमत 1.6 मिलियन यूरो (सुमारे 14 कोटी रुपये) असल्याचे सांगण्यात येते.
नवी दिल्ली- अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) फरार उद्योगपती विजय मल्ल्याभोवती कारवाईचा फास आवळला आहे. ईडीने विजय मल्ल्याची फ्रान्समधील 1.6 मिलियन यूरो मूल्य असलेली संपत्ती जप्त केली आहे. ईडीच्या विनंतीनंतर विजय मल्ल्याची '32 एव्हेन्यू फोच' ही मालमत्ता फ्रेंच ऑथोरिटीने जप्त केली आहे. फ्रान्समध्ये जप्त करण्यात आलेल्या संपत्तीची किंमत 1.6 मिलियन यूरो (सुमारे 14 कोटी रुपये) असल्याचे सांगण्यात येते. किंगफिशर एअरलाइन्स लि.च्या बँक खात्यातून विदेशातून मोठी रक्कम काढण्यात आल्याचे तपासात समोर आलेले आहे.
नऊ हजार कोटी रुपयांच्या बँक कर्ज फसवणुकीतील आरोपी विजय मल्ल्या सध्या ब्रिटनमध्ये आहे. भारताने काही महिन्यांपूर्वी ब्रिटन सरकारला विजय मल्ल्याला शरण देऊ नये, अशी विनंती केली होती. विजय मल्ल्याचे प्रत्यार्पण करण्यासाठी भारत सरकार ब्रिटिश सरकारच्या संपर्कात आहे. 64 वर्षीय मल्ल्या हा त्याची कंपनी किंगफिशर एअरलाइन्सच्या पतनानंतर आर्थिक फसवणुकीच्या आरोपाखाली 'वाँटेड' आहे.
हेही वाचा- लस आली म्हणजे 'कोरोना' संपला असं समजू नका; WHOच्या प्रमुखांनी दिला इशारा
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी एका ऑनलाइन पत्रकार परिषदेत सांगितले की, आम्ही ब्रिटन सरकारला विजय मल्ल्याला शरण देण्याबाबत विचार करण्यास सांगितले आहे. त्यामुळे ब्रिटन सरकारकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे भारताचे लक्ष लागून राहिले आहे. फ्रान्समधील संपत्ती जप्त करुन भारत सरकारने विजय मल्ल्याला इशारा दिला आहे. दरम्यान, यापूर्वीच विजय मल्ल्याची काही संपत्ती जप्त करण्यात आली आहे. विजय मल्ल्याने यापूर्वी दिलेला प्रस्ताव भारताने फेटाळलेला आहे.
हेही वाचा- 'भाजपची लाट वगैरे काही नाही; तेलंगणा भाजपला जरुर रोखेल'