गायक राहत फतेह अली खान यांना ईडीची नोटीस, तस्करीचा आरोप

rahat fateh ali khan
rahat fateh ali khan

नवी दिल्ली : प्रसिद्ध पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना परकीय चलनाची तस्करी देशाबाहेर केल्याच्या आरोपाखाली सक्तवसुली संचनालयाने (ईडी) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

खान हे गेल्या अनेक वर्षांपासून परकीय चलनाची तस्करी करत असल्याचे उघडकीस आले, त्यानंतर त्यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली. या प्रकरणाचा खुलासा न केल्यास त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राहत फतेह अली खान यांची 2011 साली दिल्लीतील विमानतळावर तपासणी करण्यात आली होती . तेव्हा त्यांच्याकडे 1.24 लाख अमेरिकी डॉलर आढळून आले होते. पण चौकशीत त्यांना ही रक्कम कुठून आली हे सांगता आले नाही, त्यामुळे ते परकीय चलनाची तस्करी करत असल्याचा संशय त्यांच्यावर होता. 

हे प्रकरण फेमा (परकीय चलन व्यवस्थपन) अंतर्गत असल्याने ईडीकडून या प्रकरणाची चौकशी केली गेली. खान या प्रकरणाचा खुलासा करू शकले नाहीत, तर त्यांच्या अडचणी वाढतील व त्यांच्याकडून 300 टक्के दंड आकारला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी सांगितली.    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com