Editors Guild : बीबीसी कार्यालयातील आयकर विभागाच्या सर्वेक्षणावर एडिटर्स गिल्डचं मोठं विधान; म्हटलं... | BBC IT Survey News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BBC IT Survey

BBC IT Survey: बीबीसी कार्यालयातील आयकर विभागाच्या सर्वेक्षणावर एडिटर्स गिल्डचं मोठं विधान; म्हटलं...

BBC IT Survey- बीबीसी इंडियाच्या कार्यालयांमध्ये आयकर विभागाने केलेल्या सर्वेक्षणावर तीव्र चिंता व्यक्त करत एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने सरकारवर टीका करणाऱ्या प्रसारमाध्यमांना धमकावण्यासाठी आणि त्रास देण्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर करण्याच्या ट्रेंडचं हे पुढचं व्हर्जन असल्याचं म्हटलं.

प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी कथित करचुकवेगिरीच्या चौकशीचा एक भाग म्हणून बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांमध्ये सर्वेक्षण मोहीम राबवल्यानंतर गिल्डने हे वक्तव्य केले आहे.

दुसरीकडे ब्रिटनच्या सार्वजनिक प्रसारकांनी म्हटलं की कर अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहोत. सरकारी धोरणांवर किंवा सरकारवर टीका करणाऱ्या माध्यम संस्थांना धमकावण्यासाठी आणि त्रास देण्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर करण्याच्या प्रवृत्तीचाच एक भाग म्हणजे प्राप्तिकर विभागाचे सर्वेक्षण आहे, असे गिल्डने म्हटले आहे.

2021 मध्ये न्यूजक्लिक, न्यूजलॉन्ड्री, दैनिक भास्कर आणि भारत समाचार सारख्या माध्यम संस्थांच्या कार्यालयांमध्येही आयटी सर्वेक्षण करण्यात आले होते. 'प्रत्येक प्रकरणात छापे आणि सर्वेक्षण हे वृत्तसंस्थांकडून सरकारी आस्थापनांचे गंभीर कव्हरेज करण्याच्या पार्श्वभूमीवर होते,' असे गिल्डने म्हटले.

अशा प्रकारची चौकशी निर्धारित नियमांनुसार व्हावी आणि स्वतंत्र प्रसारमाध्यमांना घाबरवण्याच्या पद्धतीत रूपांतरीत होऊ नये, या आपल्या मागणीचा पुनरुच्चार गिल्डने केला आहे.

टॅग्स :Bjpincome tax