शिक्षणमंत्री पोखरियाल AIIMSमध्ये दाखल; CBSE परीक्षांचा निर्णय लांबणीवर?

शिक्षणमंत्री पोखरियाल AIIMSमध्ये दाखल; CBSE परीक्षांचा निर्णय लांबणीवर?

नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षणंत्री रमेश पोखरियाल (Union Education Minister Dr Ramesh Pokhriyal Nishank) उपचारांसाठी एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांना पोस्ट कोविडच्या लक्षणांचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Pokhriyal Nishank admitted to AIIMS due to post COVID complications today)

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई ) व ‘कौन्सिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन’ (सीआयएसएसए) यांच्या प्रस्तावित इयत्ता बारावीच्या परीक्षांबाबतचा अंतिम निर्णय आज जाहीर होणार होता. पूर्ण परीक्षाच रद्द करण्याऐवजी अर्ध्या किंवा दीड तासाची परीक्षा घ्यावी याबाबत केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे या परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती.

शिक्षणमंत्री पोखरियाल AIIMSमध्ये दाखल; CBSE परीक्षांचा निर्णय लांबणीवर?
आज होणार CBSE च्या बारावीचा निर्णय!
शिक्षणमंत्री पोखरियाल AIIMSमध्ये दाखल; CBSE परीक्षांचा निर्णय लांबणीवर?
BMC चा दादरमधल्या हाऊसिंग सोसायट्यांना पेड लसीकरणाचा सल्ला

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक हे आजच याबाबत घोषणा करतील असे मानले जात होते. न्यायालयाने मागील वर्षीपेक्षा या वर्षी संसर्गाची स्थिती गंभीर असल्याचे सांगत गुरुवारपर्यंत सुनावणी स्थगित ठेवली. न्यायालयाच्या निकाला आधीच केंद्र सरकार निर्णय घेईल, कारण केंद्राचा निर्णय जवळपास झाला आहे, असे सूत्रांनी सांगितलं होतं. मात्र आता शिक्षणमंत्र्यांना रुग्णालयात दाखल केल्यामुळे हा निर्णय पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल आज दुपारी २ वाजता सीबीएसई (cbse) मंडळाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार होते. त्यामुळे या बैठकीत होणाऱ्या निर्णयाकडे देशातील लाखो विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. या बैठकीत झालेल्या निर्णयानंतर देशातील इतर शिक्षण मंडळ आपल्या बारावीच्या परीक्षा संदर्भात आपल्या स्तरावर निर्णय जाहीर करणार होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com