विद्यार्थ्यांना मांस खाऊ घातल्यानं थेट शाळा बंदचा आदेश

School Closed After Serving Meat
School Closed After Serving Meate sakal

बंगळुरू : कर्नाटकमधील बागलकोट (Bagalkot Karnatak) जिल्ह्यात एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. हुंगुंडजवळील इल्कल येथील सेंट पॉल उच्च प्राथमिक शाळेत ख्रिसमसच्या (Christmas Celebration) दिवशी विद्यार्थ्यांना मांसाहारी जेवण खाऊ घातल्यानं थेट शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले. याबाबत शिक्षण विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यानं शाळेला पत्र पाठवले.

School Closed After Serving Meat
पेट्रोल तब्बल २५ रुपयांनी स्वस्त, दुचाकीस्वारांना नववर्ष भेट

कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याने 30 डिसेंबर रोजी शाळेला भेट दिली. यावेळी ख्रिसमस साजरा करताना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे शाळा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येत असल्याचे सांगितले. मात्र, आदेशमामध्ये कोणत्याही नियमांचा उल्लेख केलेला नाही. त्यांनी शाळेला एक पत्र दिले. “25 डिसेंबर रोजी ख्रिसमसच्या उत्सवादरम्यान तुम्ही विद्यार्थ्यांना वर्गात मांसहार दिला. यामुळे जनतेला आणि शिक्षण विभागाला वाईट वाटले आहे. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत शाळा बंद ठेवावी लागेल. परवानगीशिवाय शाळा पुन्हा सुरू केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल'', असे आदेशात नमूद करण्यात आले.

...अन् आदेश घेतला मागे -

स्थानिक अधिकाऱ्याने जिल्हा आयुक्त किंवा शिक्षण विभागाला न कळवता शाळा बंद करण्याचे आदेश दिले होते. शाळेने शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून दिल्यावर अधिकाऱ्याने आदेश तत्काळ मागे घेतला. शाळेने विद्यार्थ्यांना मांसाहारी जेवण खाऊ घातल्यामुळे आम्ही शाळा बंद करू शकत नाही. आम्हाला न कळवत स्थानिक अधिकाऱ्यानं आदेश दिले, असं शुक्रवारी शिक्षण विभागानं स्पष्ट केले.

मुलांचे ख्रिश्चनीकरण होत असल्याचा आरोप -

शाळा मुलांचे ख्रिश्चनीकरण करत आहे आणि त्यांचा बायबवलवर विश्वास बसावा यासाठी ब्रेनवॉश करत आहे, असा आरोप यापूर्वी उजव्या विचारणीच्या संघटनांनी केला होता. त्यांनी शाळेविरोधात आंदोलन देखील केले होते.

शाळेचं स्पष्टीकरण -

दरम्यान, ''आम्ही कोणाचेही धर्मांतर करत नाही. पहिली गोष्ट म्हणजे शाळा ख्रिश्चन मिशनरी चालवत नाहीत. हे इल्कलमधील काही रहिवासी चालवतात. शाळा भाड्याच्या जागेत चालवली जाते. शाळा समितीमध्ये सर्व धर्माच्या सदस्यांचा समावेश आहे. शाळेत सर्व धर्माचे विद्यार्थी आहेत. शाळेत दुपारचे जेवणच देण्यात आले नाही,” असं शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य जॅक्सन डी मार्क यांनी माध्यमांना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com