आठ वर्षीय बालिकेवर मोठ्या भावाचा बलात्कार

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 जुलै 2018

''जेव्हा घरी कोणीही नव्हते. त्यावेळी माझ्या मोठ्या भावाने मला बाहेर नेले आणि तेथे त्याने माझ्यावर जबरदस्ती केली''. 

- पीडित बालिका

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील आग्नेय भागातील आदर्शनगर भागात राहणाऱ्या एका आठ वर्षीय बालिकेवर तिच्याच अल्पवयीन भावाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबतची माहिती पोलिसांनी दिली.  

सोमवारी एका अल्पवयीन बालिकेच्या गुप्तांगातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने पीडित बालिकेला उपचारांसाठी रुग्णालयात आणले. त्यानंतर बालिकेवर बलात्कार झाल्याचे समजले, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

या घटनेनंतर पीडित बालिकेला समुदेशकाकडे पाठविले असता तिने त्यांना सांगितले, की ''जेव्हा घरी कोणीही नव्हते. त्यावेळी माझ्या मोठ्या भावाने मला बाहेर नेले आणि तेथे त्याने माझ्यावर जबरदस्ती केली''. मात्र, जेव्हा पीडित बालिकेचे पालक सायंकाळी घरी आल्यानंतर तिच्या गुप्तांगातून रक्तस्त्राव होत असल्याचे समजल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्यावर बलात्कार झाल्याचे सांगितले.  

दरम्यान, याबाबतची माहिती मिळाल्यानंतर दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मलिवाल यांनी पीडित बालिकेच्या घरी जाऊन भेट घेतली. ती जखमी अवस्थेत असल्याने तिच्यावर उपचार सुरु आहेत. काही शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहेत. सध्या तिची प्रकृती गंभीर असल्याचेही त्यांनी सांगितले. 

Web Title: Eight year old girl raped by elder brother in Delhi