खडसेंबाबत मुख्यमंत्र्यांचे मौन

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 3 मे 2018

नवी दिल्ली - ज्येष्ठ भाजप नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) क्‍लीन चिट मिळाल्याने त्यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य फेरप्रवेशाबाबत ‘ऑन रेकॉर्ड’ काहीही बोलण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज टाळले. मात्र ‘एसीबी’ने आपला अहवाल न्यायालयाला सादर केल्याने खडसे यांच्याबाबत तेथूनच निकाल येईल, असे मुख्यमंत्र्यांनी अनौपचारिकरीत्या सांगितल्याचे समजते. 

दरम्यान, सौदी अरेबियाच्या ‘एमआर’ उद्योगसमूहाने महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुकता दाखविली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज दिल्लीत झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेला हजेरी लावली. पुढील लोकसभा निवडणुकीनंतर म्हणजे ऑक्‍टोबर २०१९ नंतर सुरू होणाऱ्या महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जन्मशताब्दीचा आराखडा बनविण्यासाठी मोदी सरकारने ही बैठक बोलावली होती. राजकीयदृष्ट्या चर्चित खडसे फेरप्रवेशप्रकरणी फडणवीस यांनी गूढ हास्य करत अधिकृतरीत्या बोलण्याचे टाळले. खडसे यांच्या कथित गैरव्यवहाराचा मुद्दा तूर्तास न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हा चेंडू कोर्टाकडे टोलविला.

Web Title: eknath khadse devendra fadnavis politics