कोण पुढे, कोण मागे...

टीम ई सकाळ
शनिवार, 11 मार्च 2017

नवी दिल्ली- उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा व मणिपूरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला आज (शनिवार) सकाळी आठ वाजता मोठ्या उत्साहात सुरवात झाली. पाचही राज्यांमध्ये आघाडी घेतलेल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

देशातील नागरिकांचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशात भारतीय जनता (भाजप) पक्ष सुसाट असून, समाजवादी पक्षाची सायकल धिम्या गतीने धावताना दिसत आहे. पंजाबमध्ये काँग्रेस व आम आदमी पक्षात चुरस दिसत आहे. उत्तराखंडमध्ये भाजप व काँग्रेसमध्ये काटे की कट्टर सुरू आहे. गोव्यात मात्र काँग्रेसच पुढे आहे. मणिपूरमध्ये काँग्रेस व इतर पक्षांमध्ये लढत सुरू आहे.

सकाळी साडेनऊच्या सुमारास आलेल्या आकडेवारीनुसार आघाडीवर असलेले पक्ष-

  • उत्तर प्रदेश - भारतीय जनता पक्ष, काँग्रेस
  • पंजाब - काँग्रेस, आम आदमी पक्ष
  • उत्तराखंड - भारतीय जनता पक्ष, काँग्रेस
  • गोवा - काँग्रेस
  • मणिपूर - काँग्रेस, इतर
Web Title: UP election 2017 Manipur election Goa election Narendra Modi