Election Commission changed the time for Modis meeting says Congress
Election Commission changed the time for Modis meeting says Congress

मोदींच्या सभेसाठी निवडणूक आयोगाने बदलली वेळ: काँग्रेस

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अजमेर येथे होणाऱ्या सभेसाठी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेची वेळ बदलली असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

निवडणूक आयोग आज (शनिवार) पत्रकार परिषद घेऊन मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. यापूर्वी या पत्रकार परिषदेची वेळ दुपारी साडेबारा वाजता ठरली होती. पण, मोदी आज एक वाजता अजमेर येथे सभेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने आता पत्रकार परिषदेची वेळ दुपारी तीन वाजता ठेवली आहे. यावरून काँग्रेसने निवडणूक आय़ोगावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
 

काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, की या तीन तथ्यांमधून एक निष्कर्ष काढा, एक म्हणजे निवडणूक आयोग 5 राज्यांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्य़ासाठी साडेबारा वाजता पत्रकार परिषद बोलविली होती. मोदी दुपारी एक वाजता अजमेरला सभा घेणार आहेत आणि निवडणूक आयोग आता तीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. त्यामुळे एकच प्रश्न उरतो की निवडणूक आयोग स्वतंत्र आहे का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com