सरकारद्वारे नव्हे स्वतंत्र पॅनलद्वारे होणार निवडणूक आयुक्तांची नियुक्ती? SCनं निर्णय ठेवला राखून : EC Appointments | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

supreme court directed modi govt

EC Appointments: सरकारद्वारे नव्हे स्वतंत्र पॅनलद्वारे होणार निवडणूक आयुक्तांची नियुक्ती? SCनं निर्णय ठेवला राखून

नवी दिल्ली : देशाचे मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती आता सरकारद्वारे नव्हे तर स्वतंत्र पॅनेलद्वारे होणार का? याबाबत लवकरच सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे. याबाबत दाखल याचिकांवर सुनावणीनंतर कोर्टानं आपला निर्णय राखून ठेवला आहे. (Election commissioner appointments will be appointed by an independent panel or not SC reserve our judgment)

निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती प्रक्रियेसंदर्भात सुप्रीम कोर्टात गुरुवारी पुन्हा सुनावणी पार पडली. यावेळी केंद्रानं नियुक्तीच्या प्रक्रियेशी संबंधीत फाईल कोर्टाला सोपवली. हे पाहिल्यानंतर खंडपीठानं अनेक सवाल उपस्थित केले. अरुण गोयल यांचं नाव एकाच दिवसात प्रकाशवेगानं कसं फायनल झालं? असंही कोर्टानं विचारलं.

हेही वाचा: Artemis Spacecraft : नासाने लाँच केलेल्या स्पेसक्राफ्टने पाठवला चंद्रावरून पृथ्वीचा ब्लू डॉट फोटो

सुप्रीम कोर्टाच्या संविधानपीठानं प्रश्न केला की, निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी कायदा मंत्र्यांकडून पंतप्रधानांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आलेल्या चार नावांना शॉर्टलिस्ट करण्यामागे काय निकष होते? सध्या सुप्रीम कोर्टात निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी स्वतंत्र व्यवस्थेची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. अशातच केंद्रानं ही नियुक्ती केली नसती तर बरं झालं असतं.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

एका दिवसातील नियुक्तीवर उपस्थित केले प्रश्न

याचिकाकर्त्यांचे वकील प्रशांत भूषण यांनी कोर्टाला सूचित केलं की, गोयल यांची नियुक्ती आधीच निश्चित झाली होती. कारण दोन दिवस आधीच त्यांनी सरकारच्या सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. अॅटर्नी जनरल यांनी कोर्टात यासंदर्भातील फाईल समोर ठेवल्यानंतर कोर्टानं अनेक प्रश्न उपस्थित केले. कोर्टानं म्हटलं की, एका दिवसांतच गोयल यांची नियुक्ती का केली गेली? एका व्यक्तीचा ६ वर्षांचा कार्यकाळही पूर्ण होणार नसेल तर त्यांची नियुक्ती का केली गेली? न्या. रस्तोगी म्हणाले, १५ नोव्हेंबरला पदरिक्त झालं. त्यानंतर त्याच दिवशी यासंबंधीची फाईल क्लिअर करण्यात आली. त्याच दिवशी नोटिफिकेशन निघालं आणि त्याच दिवशी नियुक्तीला मंजुरीही देण्यात आली. ही फाईल २४ तासही फिरली नाही, हे तर प्रकाशवेगानं काम झालंय.