राजकीय पक्षांकडून 'ईव्हीएम'ला बळीचा बकरा : निवडणूक आयुक्त

वृत्तसंस्था
रविवार, 3 जून 2018

''ईव्हीएमला बळीचा बकरा बनविला जात आहे. कारण मशिन्स बोलू शकत नाही. निवडणुकीत झालेला पराभव लपविण्यासाठीच राजकीय पक्ष ईव्हीएमवर शंका उपस्थित करतात''.

-  ओमप्रकाश रावत, मुख्य निवडणूक आयुक्त

कोलाकाता : उत्तरप्रदेश निवडणुकीनंतर ईव्हीएमवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यानंतर बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी राजकीय पक्षांकडून केली जात आहे. त्यावर मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी सांगितले, की ''ईव्हीएमला बळीचा बकरा बनविला जात आहे. कारण मशिन्स बोलू शकत नाही. निवडणुकीत झालेला पराभव लपविण्यासाठीच राजकीय पक्ष ईव्हीएमवर शंका उपस्थित करतात''.

गेल्या काही दिवसांपूर्वी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकांचे निकाल समोर आले. या निवडणुकांमध्ये ज्या पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्या पक्षांकडून ईव्हीएमवर शंका उपस्थित केल्या जात होत्या. त्यावर ओमप्रकाश रावत यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, ''मतदान प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासनीयतेनुसार पार पडाव्या यासाठी ईव्हीएमसह व्हीव्हीपॅटचाही वापर केला जाणार आहे. राजकीय पक्षांकडून ईव्हीएमला विनाकारण बळीचा बकरा बनवले जात आहे. निवडणुकीत झालेला पराभव लपविण्यासाठीच राजकीय पक्ष ईव्हीएमवर शंका उपस्थित करत आहेत''.

election commission of india

दरम्यान, कैराना आणि पालघर पोटनिवडणुकीत विरोधीपक्षांनी ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा आरोप केला होता. निवडणूक आयोगाच्या विश्वसनीयतेवर विविध पक्षांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील ईव्हीएमवर शंका उपस्थित केले. निवडणूक आयोगाने याबाबत चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. त्यानंतर आता रावत यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. 

Web Title: Election Commissioner OP Rawat On EVM and ballot paper