पंजाब, गोव्यात आज मतदान 

Election Day In Punjab, Goa As BJP Faces AAP, Congress Challenge
Election Day In Punjab, Goa As BJP Faces AAP, Congress Challenge

चंडीगड/पणजी - पंजाब आणि गोवा राज्यांतील विधानसभांसाठी आज (शनिवारी) मतदान होत असून, भाजप आणि कॉंग्रेस या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांदरम्यानच मुख्य लढत असल्याचे चित्र आहे. त्याच वेळी अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्षही (आप) या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांत पदार्पण करताना सत्ताधाऱ्यांना टक्कर देण्याचा प्रयत्न करणार आहे. 

भाजप पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलाच्या साथीत सलग दोन वर्षे सत्तेत असून, गोव्यामध्येही महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाबरोबर (मगोप) आघाडी करून सत्तेत होता. निवडणूक जाहीर झाल्यानंतर लगेचच दोन्ही पक्षांनी एकमेकांपासून फारकत घेतली. या दोन्ही राज्यांतील सत्ता टिकविण्याचे आव्हान भाजपसमोर असणार आहे. कॉंग्रेसबरोबरच "आप'नेही या राज्यांमध्ये जोर लावला असल्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक सोपी नसल्याचे बोलले जात आहे. 

पंजाब आणि गोव्यानंतर उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांतही विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी उडणार आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर होत असलेल्या या सर्व राज्यांतील निवडणुका भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेची महत्त्वाची कसोटी ठरणार आहे. 

पंजाबमध्ये 89 वर्षे वयाचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्यासह त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी आणि कॉंग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार अमरिंदरसिंग, उपमुख्यमंत्री आणि बादल यांचा मुलगा सुखबीर, माजी लष्करप्रमुख शिरोमणी अकाली दलाचे उमेदवार जे. जे. सिंग, भाजपमधून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू, "आप'चे खासदार भगवंत मान यांच्यासह अनेक दिग्गजांचे भवितव्य पणाला लागले आहे. 

दरम्यान, सतलज-यमुना कालव्याच्या मुद्यावरून अमरिंदरसिंग यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे अमृतसर लोकसभा मतदारसंघासाठीही उद्या (शनिवारी) मतदान होत आहे. 

गोव्यामध्ये विद्यमान मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासह रवि नाईक, दिगंबर कामत, प्रतापसिंह राणे आणि लुईझिन्हो फालेरो या कॉंग्रेसच्या तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर रिंगणात उतरलेले चर्चिल अलेमाव या पाच माजी मुख्यमंत्र्यांच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या दृष्टीनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com