राज्यसभेसाठी स्थानिक उमेदवार द्या!

काँग्रेस श्रेष्ठींकडे प्रदेश शाखांचा आग्रह; ‘जी-२३’ गट किंमत वसुलीसाठी सज्ज
Election for 56 Rajya Sabha seats on June 10 Local candidates for Rajya Sabha elections G-23 group
Election for 56 Rajya Sabha seats on June 10 Local candidates for Rajya Sabha elections G-23 groupElection for 56 Rajya Sabha seats on June 10 Local candidates for Rajya Sabha elections G-23 group

नवी दिल्ली : राज्यसभा निवडणुकीसाठी स्थानिक उमेदवार देण्यासाठी काँग्रेस नेतृत्वावर प्रदेश शाखांकडून दबाव वाढला आहे. तर, जी-२३ गटातील नेत्यांनीही बंडाचे निशाण खाली ठेवण्यासाठी किंमत वसुलीची तयारी चालविल्याचे समजते. मर्यादित जागा असल्यामुळे उमेदवार निवडीवरून काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात लॉबिंग सुरु झाले आहे. राज्यसभेच्या ५६ जागांसाठी १० जूनला निवडणूक होणार आहे.

काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, पक्षाला राजस्थान आणि छत्तीसगडमधून प्रत्येकी दोन, हरियाना, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, झारखंड आणि मध्य प्रदेशमधून प्रत्येकी एक जागा मिळेल. दोन जागांवर निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार चुरस निर्माण करू शकतील. आतापर्यंत राज्यसभेच्या जागा म्हणजे पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम असे चित्र पक्षात होते. यावेळी मात्र असंतुष्ट नेत्यांच्या जी-२३ गटाने आपल्या प्रमुख चेहऱ्यांना वरिष्ठ सभागृहात पाठविण्यासाठी कंबर कसल्याचे समजते. तर, स्थानिकच उमेदवार द्यावा यासाठी प्रदेश शाखांनी आग्रही सूर लावला आहे.

निवडणुकीमुळेच असंतुष्ट गप्प

जी-२३ गटाला चुचकारण्यासाठी पक्षाध्यक्षा सोनिया गांधींनी पुढाकार घेतल्यानंतर असंतुष्ट नेते शांत झाले असले तरी त्यामागे राज्यसभा निवडणूक असल्याचेही बोलले जाते. त्यापार्श्वभूमीवर जी-२३ गटाचा मुख्य चेहरा गुलाम नबी आझाद यांना राजस्थानमधून राज्यसभेवर पाठविले जाऊ शकते. हरियानातील एका जागेसाठी माजी प्रदेशाध्यक्षा कुमारी शैलजा यांचे चर्चेत आहे. मात्र जी-२३ गटाचे नेते आणि हरियानाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा यांनी हरियानातून आनंद शर्मा यांचे नाव पुढे केले आहे. मावळते खासदार जयराम रमेश यांना कर्नाटकमधून राज्यसभेवर आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. परंतु, राज्यातील नेत्यांनी त्यांच्या नावाला विरोध सुरू केला आहे. काँग्रेसच्या अनुसूचित जाती जमाती विभागाचे प्रमुख के. राजू, राजस्थानातील नेते व आसामचे प्रभारी भंवर जितेंद्र सिंह, पवन खेडा यांचीही राज्यसभेच्या जागेसाठी लगबग सुरू झाल्याचे समजते.

महाराष्ट्रातून चुरस

महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार पी. चिदंबरम निवृत्त होत आहेत. त्यांची आवश्यकता पाहता तामिळनाडूमधून त्यांना मित्रपक्ष द्रमुकच्या मदतीने राज्यसभेत पाठविले जाईल. काँग्रेसच्या डेटा संकलन विभागातील तज्ज्ञ प्रवीण चक्रवर्ती यांना तामिळनाडूमधून राज्यसभेवर पाठविण्यासाठी राहुल गांधी प्रयत्नशील आहेत. तर, चिदंबरम यांची बदली गृहीत धरून महाराष्ट्रात मुकूल वासनिक, विदर्भातील नेते अविनाश पांडे यांच्यात चुरस सुरू झाले यातच सुशिलकुमार शिंदे, मिलिंद देवरा, राजीव शुक्ला यांनीही प्रयत्न आरंभले असल्याने त्यांचेही नाव इच्छुकांच्या यादीमध्ये जोडले गेले आहे.

कपिल सिब्बल कोणाकडे?

जी-२३ गटाचे नेते कपिल सिब्बल हे देखील राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. गांधी कुटुंबीयांवर त्यांनी केलेले थेट आरोप पाहता काँग्रेसकडून राज्यसभेच्या जागेसाठी त्यांचे नाव बाद झाल्याचे मानले जात आहे. मात्र, सध्याच्या काळात तपास यंत्रणांची विरोधी पक्षांच्या नेत्यांकडे वळलेली वक्रदृष्टी पाहता सर्वांना वकीलांची आवश्यकता असल्याने त्यांना राष्ट्रीय जनता दल, झारखंड मुक्ती मोर्चा, तृणमूल काँग्रेस यां सारखे प्रादेशिक पक्ष मदत करतील, अशी शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com