महाराष्ट्रात शतक तर, हरियानात भाजपची दमछाक |  Election Result 2019

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

नवी दिल्ली : हरियानामध्ये विरोधकांत मोठी फाटाफूट असतानाही सत्तेवरील भाजपची बहुमताचा आकडा गाठण्यासाठी दमछाक होऊ लागल्याचे दिसून येत आहे. भाजप 40, तर त्यापाठोपाठ कॉंग्रेस 33 मतदारसंघात आघाडीवर आले. लोकदल, जननायक जनता पक्ष (जेजेपी) व अन्य पक्ष 17 मतदारसंघात आघाडीवर आहेत. हरियानात भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी अन्य पक्षांची मदत घ्यावी लागण्याची शक्‍यता आहे. 

हरियानामध्ये मुख्य विरोधी पक्ष लोकदलातील अनेक आमदार भाजपमध्ये गेले होते. लोकदलात फूट पडल्यानंतर दुष्यंत चौताला यांनी जेजेपी स्थापन केली. त्यामुळे, जाटबहुल प्रांतात चार मुख्य पक्ष रिंगणात आहेत. अशा अनुकूल स्थितीत भाजपला मोठी आघाडी मिळण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत होती. मात्र, भाजप आणि विरोधक जवळपास समान मतदारसंघात आघाडीवर आहेत. कॉंग्रेसने माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुडा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची स्थिती मजबूत केली. गेल्या निवडणुकीत भाजप 47, लोकदल 19 आणि कॉंग्रेसच्या 15 जागा होत्या. राष्ट्रवाद, विकासाचा मुद्दा आणि विरोधी पक्षातील बेबनाव यांच्या साह्याने हरियानात 70 जागांपर्यंतची मजल गाठण्याचे उद्दीष्ट ठेवून भाजप प्रचार करीत होता. मात्र, मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात त्यांना ब्रेक लागल्याचे दिसून येते. 

सुरुवातीला भाजप एकतर्फी निवडणूक जिंकेल असे चित्र असताना, काँग्रेसच नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या सभांमुळे तसेच भाजप विरोधात असलेल्या सुप्त लाटीमुळे निवडणुकीचे चित्र बदल गेले. एकतर्फी वाटणारी निवडणूक आता सम-समान पातळीवर दिसत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा हरियानात सुपडा साफ झाला होता. तुलनेत काँग्रेस या निवडणुकीत चांगली कामगिरी करताना दिसत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election Result 2019 bjp back in haryana satae and bjp Century in Maharashtra