2018 पर्यंत देशातील सर्वांना वीज - मोदी

वृत्तसंस्था
सोमवार, 5 डिसेंबर 2016

आर्थिक विकासाकारिता उर्जा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. विकासाच्या प्रारुपाच्या अगदी तळाशी असलेल्यांच्या विकासाकरिता स्थिर, शाश्‍वत आणि परवडणाऱ्या दरात उर्जा मिळणे आवश्‍यक आहे. एकीकडे देशातील श्रीमंत हे "हायब्रीड' गाड्या विकत घेत आहेत; तर गरीब हे अजूनही स्वयंपाकासाठी लाकडे वापरत आहेत...

नवी दिल्ली - भारतामधील "सर्वां'ना 2018 पर्यंत वीजपुरवठा करण्यामध्ये यश येईल, असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवार) व्यक्त केला. पंतप्रधानांनी आज "पेट्रोटेक 2016' परिषदेचे उद्‌घाटन केले. येत्या पाच वर्षांत भारतामध्ये नैसर्गिक वायुचा पुरवठा करण्यात येत असलेल्या वाहिन्यांची लांबी दुप्पट करण्यात येईल, असे मोदी यांनी परिषदेस संबोधित करताना सांगितले.

"सध्या भारतामधील नैसर्गिक वायुच्या वाहिन्यांची एकूण लांबी 15 हजार किमी आहे. येत्या पाच वर्षांत आम्ही ही लांबी दुप्पट करणार आहोत. यामुळे देशातील 1 कोटी घरांपर्यंत नैसर्गिक वायुचा पुरवठा करण्यात यश येईल,'' असे पंतप्रधान म्हणाले.

भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी देशांतर्गत तेल व नैसर्गिक वायुच्या उत्पादनात आणखी वाढ करण्याची आवश्‍यकताही त्यांनी अधोरेखित केली. या पार्श्‍वभूमीवर, 2022 पर्यंत भारताची "उर्जा आयात' 2022 पर्यंत 10 टक्‍क्‍यांनी खाली आणण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले.

"आर्थिक विकासाकारिता उर्जा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. विकासाच्या प्रारुपाच्या अगदी तळाशी असलेल्यांच्या विकासाकरिता स्थिर, शाश्‍वत आणि परवडणाऱ्या दरात उर्जा मिळणे आवश्‍यक आहे. एकीकडे देशातील श्रीमंत हे "हायब्रीड' गाड्या विकत घेत आहेत; तर गरीब हे अजूनही स्वयंपाकासाठी लाकडे वापरत आहेत. या पार्श्‍वभूमीवर, या सरकारचा भर हा दीर्घकालीन आर्थिक विकासावर आहे,'' असे मोदी म्हणले.

Web Title: electricity to all by March 2018, say PM