विजेची सबसिडी आता थेट बँक खात्यात!

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 जुलै 2019

- विज सबसिडी मिळणार थेट बँक खात्यात.

- वीजपुरवठा खंडित झाल्यास आकारण्यात येणार दंड.

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून विजेसंदर्भात नवे धोरण तयार करण्यात आले. या धोरणातील नव्या नियमानुसार विजेची सबसिडी आता थेट तुमच्या खात्यात येणार आहे. तसेच ज्या कंपन्यांकडून वारंवार वीजपुरवठा खंडित केला जातो, अशा कंपन्यांना आता सरकारकडून दंड आकारला जाणार आहे. 

केंद्र सरकारच्या शक्ती मंत्रालयाने याबाबतचे नवे धोरण तयार केले आहे. या धोरणाची अंमलबजावणी ऑगस्ट महिन्यापासून करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या या नव्या धोरणामुळे वीजचोरी रोखण्यास मदत होणार आहे. याशिवाय ग्राहकाला वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा सामना करावा लागणार नाही. 

दरम्यान, आता सर्व घरात स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहेत. या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून आपण बाहेर असलो तरीदेखील या अॅपच्या माध्यमातून घरातील विज बंद करता येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Electricity subsidy now in direct bank account

टॅग्स