हत्तीने खाल्ले पैसे; सायकलही पंक्‍चर !

वृत्तसंस्था
सोमवार, 12 सप्टेंबर 2016

आझमगड (उत्तर प्रदेश) - उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असलेले कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज प्रचारसभेत बोलताना थेट सत्ताधारी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षावर टीकास्त्र सोडले. राज्यात हत्तीने सगळे पैसे खाल्ले असून, सायकलदेखील पंक्‍चर झाली असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे. हत्तीने पैसे खाल्ल्यानंतर तुम्ही त्याला पळवून लावले आणि नंतर सायकलवाल्यांना आणले. ही सायकल पाच वर्षांपासून रुतलेलीच आहे. तिचे टायर पंक्‍चर असून, ती अद्याप रेशन कार्डदेखील देऊ शकलेली नाही, असे त्यांनी सांगितले. 

राज्यातील लोकांनी आता कॉंग्रेसच्या पंजाचा विचार करावा, आम्ही सत्तेत आल्यावर गरिबांना रेशन कार्ड तर देऊच, पण त्याचबरोबर शेतकऱ्यांचीदेखील काळजी घेऊ, असे आश्‍वासन त्यांनी दिले. राहुल गांधी हे दिल्ली ते देवरिया किसान यात्रेच्या माध्यमातून अडीच हजार किलोमीटरचा प्रवास करणार असून, विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांची ही प्रचार यात्रा महत्त्वपूर्ण मानली जात आहे. तत्पूर्वी राहुल यांनी आझमगढ आणि मऊमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन गाझीपूरकडे कूच केली होती. आझमगढ हा समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांचा बालेकिल्ला समजला जातो. 

मोदींवर टीका 

तत्पूर्वी आझमगढमध्ये आयोजित सभेत बोलताना राहुल यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. मोदी आपला सूट मळतो म्हणून गरिबांसोबत सेल्फी काढत नाहीत. त्यांना फक्त बराक ओबामा आणि चीनच्या राष्ट्रपतींसोबत सेल्फी घ्यायला आवडतो. आपला पंधरा लाख रुपयांचा सूट मळेल म्हणून ते गरिबाजवळ जात नाहीत, असेही त्यांनी नमूद केले.

Web Title: Elephant eating money; Bicycle puncture!