हत्ती करतोय स्मोकिंग!

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 मार्च 2018

बंगरुळ - हत्ती कधी स्मोकिंग करु शकतो, याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. पण कर्नाटकातल्या नागरहोल राष्ट्रीय उद्यानातला हत्ती स्मोकिंग करतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. विनय कुमार या वनाधिकाऱ्याला जंगलातून जात असताना हा प्रसंग दिसला आणि त्यांनी तो आपल्या कॅमेरात कैद केला.

या व्हिडीओत, हत्ती एक एक कोळशाचा तुकडा सोंडेने तोंडात घेताना दिसतोय. त्याचाच हा धूर हत्तीच्या तोंडावाटे बाहेर पडत आहे. आणि अशाप्रकारे हा हत्ती स्मोकिंगचा आनंद घेतोय. आता या मदमस्तं हत्तीला 'स्मोकिंग किल्स' हे कोण समजावणार?

Web Title: elephant is smoking viral video social media