Video: हॉस्पिटलमध्ये चक्क शिरला हत्तींचा कळप, पाहणाऱ्यांची उडाली भंबेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

viral video

Video: हॉस्पिटलमध्ये चक्क शिरला हत्तींचा कळप, पाहणाऱ्यांची उडाली भंबेरी

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही थक्क करणारे असतात तर काही मन सुन्न करणारे असतात. आज असाच एक मन सुन्न करणारा व्हिडिओ व्हायरल झालाय. पश्चिम बंगालच्या जाल्पैगुरी जिल्ह्यातील एका हॉस्पिटलमध्ये चक्क हत्तींचा कळप फिरत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय.

या व्हिडिओने प्रशासनाचे धाबे दणाणले. मुळात हॉस्पिटलमध्ये हत्तींचा कळप आला कसा, असा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जात आहे. (Elephants enter in a hospital ward inside an army cantonment bengals Jalpaiguri district)

हेही वाचा: Viral Video : ही आग आहे, आगीशी खेळू नका, हात जळतील - हिना खान

व्हायरल व्हिडिओमध्ये आपल्याला दिसते की हॉस्पिटलच्या प्रीमायसेस मध्ये हत्ती बिनधास्तपणे फिरत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

अशाप्रकारे प्राण्यांचा हॉस्पिटलमध्ये खुलेआम वावर हे रुग्णांच्या सुरक्षितेसाठी एक प्रकारचा मोठा धोका असल्याचे म्हणत तीव्र असंतोष नागरिकांडून व्यक्त केला जातोय.

हेही वाचा: Viral Video : देसी आंटींचा 'जबरदस्त' डान्स, व्हिडिओ पाहून म्हणाल कुठे गेली ग्रॅव्हिटी

सध्या या घटनेचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतोय. प्रशासनाने या घटनेविरोधात त्वरीत पाऊले उचलावी अशी मागणीसुद्धा नेटकऱ्यांकडून केली जात आहेत.

Web Title: Elephants Enter In A Hospital Ward Inside An Army Cantonment West Bengals Jalpaiguri District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..