अकरा अधिकाऱ्यांना विशेष पोलिस पदके

Union-Home-Ministry
Union-Home-Ministry

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्रालयाने उत्कृष्ट तपासकार्यासाठी देशातील 96 पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांना विशेष पोलिस पदक जाहीर केले असून, महाराष्ट्रातील 11 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.

पोलिसांमध्ये तपास कार्याबद्दल उच्च व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण व्हावा तसेच उत्तम तपासकार्य करणाऱ्या पोलिसांच्या कार्याची दखल म्हणून केंद्रीय गृहमंत्रालयाने गेल्या वर्षीपासून उत्कृष्ट तपासकार्यासाठी "विशेष पोलिस पदक' सन्मान सुरू केला आहे. यावर्षी उत्कृष्ट तपासकार्यासाठी देशभरातील 96 पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील 11 पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांसह अन्य राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे पोलिस अधिकारी-कर्मचारी तसेच राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए), केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि अमली पदार्थ नियंत्रण विभाग (एनसीबी)च्या अधिकारी- कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.

यांचा समावेश
महाराष्ट्र पोलिस विभागाने केलेल्या उत्कृष्ट तपासकार्याची दखल घेऊन राज्यातील 11 पोलिस अधिकाऱ्यांना विशेष पोलिस पदक जाहीर झाले आहे. यात, पोलिस उपअधीक्षक प्रशांत अमृतकर, पोलिस निरीक्षक सर्वश्री अविनाश आघाव, सुरेश रोकडे, प्रदीप भानुशाली, हेमंत पाटील, सागर शिवलकर, संजय निकुंबे, सुधाकर देशमुख आणि सहायक पोलिस निरीक्षक सचिन माने यांच्यासह श्रद्धा वायदंडे आणि प्रियांका शेळके या महिला सहायक पोलिस निरीक्षकांचाही समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com