नोकरी सोडतानाही भरावा लागू शकतो, 18 टक्के जीएसटी; वाचा अजब नियम!

टीम ई सकाळ
Wednesday, 13 January 2021

राजीनामा दिल्यानंतर ठराविक कालावधी काम करावं लागतं. हा नोटीस पिरियड पूर्ण न करता नोकरी सोडल्यास आता कर्मचाऱ्यांना फटका बसू शकतो.

अहमदाबाद - एखाद्या कंपनीत नोकरी करत असताना जर राजीनामा दिल्यानंतर ठराविक कालावधी काम करावं लागतं. हा नोटीस पिरियड पूर्ण न करता नोकरी सोडल्यास आता कर्मचाऱ्यांना फटका बसू शकतो. गुजरात अथॉरिटी ऑफ अ‍ॅडव्हान्स रुलिंगने नोटिस पिरियड पूर्ण न करता नोकरी सोडल्यास 18 टक्के जीएसटी आकारण्यात येईल असं सांगितलं आहे

नोकरी सोडताना प्रत्येक कंपनीमध्ये ठराविक काळाचा नोटीस पिरियड असतो. तो कालावधी 1 ते 3 महिन्यापर्यंतचा असू शकतो. आता नोकरी अचानक सोडल्यास कंपनीच्या नियमांव्यतिरिक्त आणखी आर्थिक फटका बसू शकतो. जर नोटीस पिरियडचा कालावधी जास्त असेल तर कर्मचाऱ्यांना एक महिन्याच्या वेतनाइतकंही पैसे द्यावे लागू शकतात. 

हे वाचा - चिंता नको, Whatsappचा डेटा सर्वरमधून डिलिट करता येतो; जाणून घ्या प्रोसेस

गुजरात अथॉरिटी ऑफ अ‍ॅडव्हान्स रुलिंगने हा निर्णय घेतला आहे. नोटीस पिरियड पूर्ण न केल्यास हा दंड भरावा लागणार आहे. कर्मचारी अचानक नोकरी सोडून गेल्यानं कंपनीचं नुकसान होत असल्याचं म्हटलं आहे.

हे वाचा - 350 आरोपी, 900 साक्षीदार; इटलीतल्या खटल्याकडं संपूर्ण जगाचं लक्ष


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: employee may pay 18 percent GST leaving job without serving notice period