देशात बेरोजगारीचे संकट कायम 

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

अहवाल म्हणतो... 
- भारतातील बेरोजगारीचा दर या वर्षी 3.5 टक्के 
- चीनचा बेरोजगारीचा दर वाढून 4.8 टक्‍क्‍यांवर जाणार 
- भारतातील 77 टक्के; तर चीनमधील 33 टक्के रोजगार असुरक्षित 
- भारत, बांगलादेश, कंबोडिया आणि नेपाळमध्ये असंघटित क्षेत्रात सुमारे............ टक्के कामगार 
- आशिया-प्रशांत क्षेत्रातील अर्थव्यवस्था सरासरी 5.5 टक्‍क्‍यांनी वाढणार. 
- भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग 7.4 टक्के राहील, त्यामुळे दक्षिण आशियामध्ये आर्थिक आघाडी समाधानकारक असेल 
- इन्फर्मेशन, कम्युनिकेशन अँड टेक्‍नॉलॉजी क्षेत्रामध्ये भारतात रोजगारवाढ 
- भारतातील सेवाक्षेत्रही वाढले, पण दर्जा खालावला 
- जगभरात 1.4 अब्ज अस्थिर नोकऱ्या, त्यापैकी 39.4 कोटी रोजगार भारतात 
- भारतातील आपारंपरिक ऊर्जेचा वापर 40 टक्‍क्‍यांवर गेला, तर 30 लाख नव्या नोकऱ्या निर्माण होतील 

नवी दिल्ली : आशियातील वेगाने विकासित होणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताची ओळख निर्माण होत असली, तरी वाढत्या बेरोजगारीने देशासमोर नवे संकट उभे केले आहे. भारतातील तब्बल 77 टक्‍के रोजगार अस्थिर असल्याचा इशारा संयुक्‍त राष्ट्रांच्या "इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन'च्या अहवालात देण्यात आला आहे. 

चालू वर्षात भारतातील बेरोजगारीचा दर 3.5 टक्के राहण्याचा अंदाज "इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन"च्या "द वर्ल्ड एम्प्लॉयमेंट अँड सोशल आउटलूक- ट्रेंड्‌स 2018' या अहवालात व्यक्‍त करण्यात आला आहे. मात्र तो चीनच्या तुलनेत कमी आहे. चीनचा बेरोजगारी दर 4.8 टक्‍क्‍यांपर्यंत वाढल्याचे म्हटले आहे. गेल्या काही दशकांत भारतात सेवा क्षेत्रामधून मोठी रोजगारनिर्मिती झाली आहे. मात्र असंघटितपणा आणि असुरक्षितेमुळे या क्षेत्रातील रोजगारांवर टांगती तलवार असल्याचा इशारा या अहवालात देण्यात आला आहे. पुढील वर्षअखेरपर्यंत भारतातील तब्बल 77 टक्के रोजगार अस्थिर असल्याचे या अहवालात म्हटले आहे. याच कालावधीसाठी चीनमधील केवळ 33 टक्के नोकऱ्या अस्थिर श्रेणीत राहतील, असे म्हटले आहे. 

कृषी क्षेत्रातील रोजगार असुरक्षित 
भारत, बांगलादेश, कंबोडिया आणि नेपाळ या देशांमधील 90 टक्के रोजगार असंघटित असून, तो कृषीशी निगडित आहे. यामधील कर्मचाऱ्यांसाठी पुरेशा सुविधा आणि कल्याणकारी योजनांचा अभाव आहे. बिगर कृषी क्षेत्र जसे बांधकाम, घाऊक आणि किरकोळ किराणा, वाहतूक सेवा आणि अन्नधान्यांची सेवा यामध्ये रोजगाराच्या संधी व्यापक होतील. उत्पादन क्षेत्रात असंघटित रोजगारांचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता आहे. 

अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात रोजगाराच्या संधी 
भारतातील 40 टक्के वीजनिर्मिती 2030पर्यंत अपारंपरिक ऊर्जा स्रोतातून केल्यास या क्षेत्रात जवळपास 30 लाख नवे रोजगार निर्माण होतील, असा अंदाज "इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन'च्या अहवालात व्यक्‍त करण्यात आला आहे. मे अखेर अपारंपरिक ऊर्जा स्रोतातून एकूण वीजनिर्मितीच्या 7.5 टक्के वीजनिर्मिती करण्यात आली आहे. शाश्‍वत वीजनिर्मितीच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू असून, इलेक्‍ट्रिक कार, ग्रीन बिल्डिंग, ग्रीन टेक्‍नॉलॉजी आदी औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार आहे. 

अहवाल म्हणतो... 
- भारतातील बेरोजगारीचा दर या वर्षी 3.5 टक्के 
- चीनचा बेरोजगारीचा दर वाढून 4.8 टक्‍क्‍यांवर जाणार 
- भारतातील 77 टक्के; तर चीनमधील 33 टक्के रोजगार असुरक्षित 
- भारत, बांगलादेश, कंबोडिया आणि नेपाळमध्ये असंघटित क्षेत्रात सुमारे............ टक्के कामगार 
- आशिया-प्रशांत क्षेत्रातील अर्थव्यवस्था सरासरी 5.5 टक्‍क्‍यांनी वाढणार. 
- भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग 7.4 टक्के राहील, त्यामुळे दक्षिण आशियामध्ये आर्थिक आघाडी समाधानकारक असेल 
- इन्फर्मेशन, कम्युनिकेशन अँड टेक्‍नॉलॉजी क्षेत्रामध्ये भारतात रोजगारवाढ 
- भारतातील सेवाक्षेत्रही वाढले, पण दर्जा खालावला 
- जगभरात 1.4 अब्ज अस्थिर नोकऱ्या, त्यापैकी 39.4 कोटी रोजगार भारतात 
- भारतातील आपारंपरिक ऊर्जेचा वापर 40 टक्‍क्‍यांवर गेला, तर 30 लाख नव्या नोकऱ्या निर्माण होतील 

Web Title: employment is major problem in India international labour organisation report