पंधरा दिवसांत बंगले रिकामे करा ; मुख्यमंत्र्यांना मालमत्ता विभागाची नोटीस

वृत्तसंस्था
शनिवार, 19 मे 2018

लखनौ : उत्तर प्रदेश सरकारने बुधवारी रात्री राज्यातील सहा माजी मुख्यमंत्र्यांना शासकीय बंगले रिकामे करण्यासाठी नोटीस बजावली असून, यासाठी त्यांना पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात भाजपच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयानेही माजी मुख्यमंत्र्यांना शासकीय निवासस्थान सोडण्याचे आदेश दिले होते. आता मालमत्ता विभागाने या नेत्यांना नोटीस बजावली आहे. 

पद गेल्यानंतर शासकीय निवासस्थानी ठाण मांडून बसणाऱ्या माजी मुख्यमंत्र्यांमध्ये नारायणदत्त तिवारी, मुलायमसिंह यादव, कल्याणसिंह, मायावती, राजनाथसिंह आणि अखिलेश यादव यांचा समावेश आहे. लखनौमधील उच्चसुरक्षा असलेल्या व्हीव्हीआयपी झोनमधील निवासस्थानी सध्या या नेत्यांच्या नातेवाइकांचे वास्तव्य आहे. याआधीही सर्वोच्च न्यायालयाने याच मुद्यावरून माजी मुख्यमंत्र्यांची कानउघाडणी केली होती.

एकदा मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर नेते हे सामान्य माणसेच असतात. त्यामुळे नंतर त्यांना शासकीय निवासस्थानी वास्तव्य करता येत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. "लोकप्रहरी' या स्वयंसेवी संस्थेने याविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. 

Web Title: Empty bungalows within fifteen days Property Tax Notice to Chief Minister