बंदिपोरामध्ये चकमक; 3 जवान हुतात्मा 

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

बंदिपोरा जिल्ह्यातील परायपोरा गावात लष्करी जवानांकडून शोधमोहिम सुरु असताना दहशतवाद्यांकडून जवानांवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोन जवान जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील बंदिपोरा जिल्ह्यात आज (मंगळवार) पहाटे सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन जवान हुतात्मा झाले असून, 15 जवान जखमी झाले आहेत. या चकमकीत एक दहशतवाद्याला ठार मारण्यात आले आहे.

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदिपोरा जिल्ह्यातील परायपोरा गावात लष्करी जवानांकडून शोधमोहिम सुरु असताना दहशतवाद्यांकडून जवानांवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात तीन जवान हुतात्मा झाले. तर 15 जवान जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला असून, अद्याप चकमक सुरु आहे. याठिकाणी लष्कराकडून अधिकची कुमक मागविण्यात आली आहे.

कुलगाम जिल्ह्यात रविवारी झालेल्या भीषण चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. तर, दोन जवान हुतात्मा झाले होते व एक नागरिक ठार झाला होता.

Web Title: Encounter breaks out in J&K's Bandipora, 2 jawans injured