सोपोर येथे दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक सुरू

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

  • लष्करी जवानांनी जम्मू-काश्मीर भागात सर्च ऑपरेशन राबवले आहे.
  • काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा जवानांनी अभियान छेडले आहे.

श्रीनगर : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून हाय अलर्ट लागू करण्यात आला आहे. येथे आणखी काही दहशतवादी लपले असल्याची शक्यता सुरक्षा दलाकडून व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने शोध मोहीम हाती घेतली असता येथील सोपोर परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली.  

लष्करी जवानांनी त्या भागात सर्च ऑपरेशन राबवले आहे. या दरम्यान उत्तर काश्मीरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे सध्या दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक सुरु आहे. जवळपास दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे आणि ते सुरक्षा जवानांवर गोळीबार करत आहेत. 

काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा जवानांनी अभियान छेडले आहे. या अभियानाला ऑपरेशन 60 असे नाव देण्यात आले आहे. येथे 60 दहशतवादी सक्रिय आहेत.
 

'सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Web Title: encounter has started between terrorists and security forces in jammu and kashmirs sopore area