बंदीपूरमध्ये भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांत चकमक

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

बंदीपूर- दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारामुळे काश्मीर खोऱ्यात आज (गुरुवार) सकाळी भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. भारतीय लष्कराने येथील परिसराला ताबडतोब वेढा देऊन तिथे शोध मोहीम सुरू केली. 

उत्तर काश्मीरमधील बंदीपूर जिल्ह्यात ही चकमक सुरू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या परिसरात दहशतवादी लपून बसले असल्याबद्दल गुप्तचरांकडून मिळालेल्या नेमक्या माहितीच्या आधारे लष्कराने कारवाई सुरू केली. जिल्ह्यातील हाजीँ भागातील शाहगुंड गावात दहशतवादी असल्याचे सैन्याला समजले. त्यानुसार त्या भागाला वेढा देऊन भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू केला, असे पोलिसांनी सांगितले. 

ही शोध मोहीम सुरू असतानाच लपलेल्या दहशतवाद्यांनी सैन्यावर गोळीबार करायला सुरवात केली. त्यामुळे सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. ही मोहीम अद्याप सुरू असल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले. 
 
Web Title: Encounter underway between security forces and militants in Bandipora