जम्मू-काश्मीरमध्ये चकमक; २ दहशतवाद्यांचा खात्मा

वृत्तसंस्था
Saturday, 4 April 2020

गोळीबाराला जवानांकडून प्रत्युत्तर

- सुंदरबनमध्ये गोळीबार

श्रीनगर : जगभरात कोरोनासारखे मोठे संकट असताना मात्र दुसरीकडे सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील मनगोरी परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संपूर्ण जगात कोरोनाचे सावट पाहिला मिळत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरसह देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लोकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी वारंवार प्रशासनाकडून आवाहनही करण्यात येत आहे. कुलगाम जिल्ह्यातील मनगोरी परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानुसार, या भागात शोधमोहीम सुरू आहे.

Indian Army

सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये कुलगाममध्ये चकमक सुरू झाली. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेरले. त्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

गोळीबाराला जवानांकडून प्रत्युत्तर

या परिसरात दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून, त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. यामध्येच दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

Army

सुंदरबनमध्ये गोळीबार

जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये सुंदरबन परिसरात शुक्रवारी सीमारेषेचे उल्लंघन करण्यात आले होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोळीबारही करण्यात आला होता. भारतीय सैन्याकडून या हल्ल्याला चौख प्रत्युत्तर देण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Encounter underway between security forces and terrorists in Manzgam of Kulgam