अहंकारी सत्तेचा हा शेवट - अखिलेश
उत्तर प्रदेशातील लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांचे निकाल हाती आले आहेत. त्यावर देशाचे विभाजन करणाऱ्या प्रवृत्तींचा हा पराभव असल्याचे मत समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी व्यक्त केले आहे.
कैराना - उत्तर प्रदेशातील लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांचे निकाल हाती आले आहेत. त्यावर देशाचे विभाजन करणाऱ्या प्रवृत्तींचा हा पराभव असल्याचे मत समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी व्यक्त केले आहे.
कैराना आणि नूरपुरच्या जनतेचे, तसेच कार्यकर्ते आणि सगळ्या भाजपविरोधी एकत्र आलेल्या पक्षाचे हे यश आहे. हे एकता आणि शांतीवर विश्वास करणाऱ्या जनतेचा विजय आहे तर अहंकारी सत्तेचा हा शेवट असल्याचेही अखिलेश यांनी सांगितले आहे. त्यांनी विजयाच्या सर्वांना ट्विटरवरुन शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
कैराना और नूरपुर की जनता, कार्यकर्ताओं, उम्मीदवारों व सभी एकजुट दलों को जीत की हार्दिक बधाई! कैराना में सत्ताधारियों की हार उनकी अपनी ही प्रयोगशाला में, देश को बाँटने वाली उनकी राजनीति की हार है. ये एकता-अमन में विश्वास करने वाली जनता की जीत व अहंकारी सत्ता के अंत की शुरूआत है.
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) May 31, 2018
उत्तर प्रदेशातील लोकसभा व एक विधानसभेच्या पोटनिवडणूक जागेत भाजपचा पराभव झाला आहे. कैराना येथे होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणूकीत भारतीय जनता पक्षाला मागे टाकत अजितसिंह यांच्या राष्ट्रीय लोकदलाच्या तबस्सूम हसन यांनी विजय मिळवला आहे. तर नुरपूर विधानसभा मतदारसंघात समाजवादी पार्टीच्या उमेदवाराने विजय मिळवला आहे. या दोनही जागा आधी भाजपकडे होत्या. या दोन्ही जागांवर पराभव म्हणजे भाजपला मोठा धक्का आहे.