पापा, माझ्यावरही त्याच्या शेजारीच अंत्यसंस्कार करा...

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

पापा, माझ्या प्रेम कहाणीचा दुःखद शेवट करतेय. माझ्या प्रियकरावर जेथे अंत्यसंस्कार केले ना अगदी त्याच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा, असे लिहून एका प्रियेसीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

मेरठ (उत्तर प्रदेश): पापा, माझ्या प्रेम कहाणीचा दुःखद शेवट करतेय. माझ्या प्रियकरावर जेथे अंत्यसंस्कार केले ना अगदी त्याच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा, असे लिहून एका प्रियेसीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

फलावद गावामधील एका प्रेमाचा दुर्देवी शेवट झाला आहे. प्रियकराच्या मृत्यूनंतर प्रेयसीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघांच्या मृत्यूमुळे अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,' एका कुटुंबामधील युवतीचा नात्यामधील युवकाशी विवाह करण्याचे ठरले होते. यामुळे दोघे एकमेकांना भेटू लागले. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. परंतु, काही दिवसानंतर दोन्ही कुटुंबियांमध्ये वाद निर्माण झाला. दोघांचा विवाह तोडण्यात आला. नैराष्य आल्यामुळे युवकाने आत्महत्या केली. प्रियकराने आत्महत्या केल्यानंतर युवतीनेही सोमवारी (ता. 21) गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने चिठ्ठी लिहून ठेवली आहे. युवतीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून, शवविच्छेदन अहवालासाठी पाठविण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास करत आहोत.'

युवतीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये म्हटले आहे की, 'पापा मला जायचेच होते. माझ्यामुळे तुमची इज्जतली धक्का बसला. फक्त माझे तुमच्याकडे एकच मागणे आहे, पापा, माझ्या प्रेम कहाणीचा दुःखद शेवट करतेय. माझ्या प्रियकरावर जेथे अंत्यसंस्कार केले ना अगदी त्याच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: end of love story in meerut girlfriend dies after lover