"ईडी'कडून जुन्या नोटा बदलून देणारी टोळी जेरबंद

पीटीआय
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

या टोळीस पकडण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये ईडीच्या कर्मचाऱ्यांनी जुन्या नोटा बदलण्यासाठी आलेल्या "ग्राहकां'ची भूमिका बजावली. जुन्या नोटा बदलून देण्यासाठी या टोळीमधील दलालांकडून 15 ते 35% दलाली आकारण्यात येत असल्याचेही या तपासामध्ये आढळून आले

बेंगळुरु- - नोटाबंदीच्या निर्णयानंतर बेकायदेशीररित्या नोटा बदलून देणाऱ्या एका मोठ्‌या टोळीस पकडण्यामध्ये सक्‍तवसुली संचलनालयास (ईडी) यश आले आहे. या प्रकरणासंदर्भात ईडीकडून कर्नाटकमध्ये सात जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 93 लाख रुपये किंमतीच्या दोन हजारांच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

प्राप्तिकर विभागानेही नुकत्याच टाकलेल्या धाडीमध्ये बेकायदेशीररित्या जमवलेले नव्या चलनातील 5.7 कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास करताना ईडीकडून ही कारवाई करण्यात आली. या टोळीस पकडण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये ईडीच्या कर्मचाऱ्यांनी जुन्या नोटा बदलण्यासाठी आलेल्या "ग्राहकां'ची भूमिका बजावली. जुन्या नोटा बदलून देण्यासाठी या टोळीमधील दलालांकडून 15 ते 35% दलाली आकारण्यात येत असल्याचेही या तपासामध्ये आढळून आले.

बॅंकांमधील काही कर्मचाऱ्यांशी हातमिळवणी करुन ही टोळी काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.

Web Title: Enforcement Directorate arrests 7 middlemen, seizes Rs 93 lakh