मुकेश अंबानींच्या मुलाचा साखरपुडा संपन्न

वृत्तसंस्था
रविवार, 25 मार्च 2018

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे ज्येष्ठ पुत्र आकाश अंबानी यांचा साखरपुडा समारंभ पार पडला. आकाश अंबानी यांचा साखरपुडा अब्जाधीश हिरे व्यावसायिक रसेल मेहता यांच्या कन्या श्लोका मेहता यांच्याशी झाला.

नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे ज्येष्ठ पुत्र आकाश अंबानी यांचा साखरपुडा समारंभ पार पडला. आकाश अंबानी यांचा साखरपुडा अब्जाधीश हिरे व्यावसायिक रसेल मेहता यांच्या कन्या श्लोका मेहता यांच्याशी झाला. हा साखरपुडा समारंभ काल (शनिवार) गोवा येथे संपन्न झाला. 

Shloka mehta and aakash ambani

आकाश अंबानींच्या साखरपुडा समारंभासाठी मुकेश अंबानी, नीता अंबानी, त्यांची आई कोकीलाबेन अंबानी आणि इतर नातेवाईकांनी उपस्थिती लावली. अंबानी आणि मेहता हे दोघेही व्यावसायानिमित्त ओळखत असे. त्यानंतर आकाश आणि श्लोका यांचा साखरपुडा झाला. आकाश आणि श्लोका हे दोघेही धीरुभाई अंबानी आंतरराष्ट्रीय विद्यालयात शिक्षण घेत होते. त्यांचा काल साखरपुडा झाल्यानंतर त्यांचा विवाह यावर्षी होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अंबानी आणि मेहता या दोन्ही परिवाराकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही.

Shloka mehta and aakash ambani

श्लोका मेहता यांचे धीरुभाई अंबानी आंतरराष्ट्रीय विद्यालयात शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी विधीचे शिक्षण 'द लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स' येथून पूर्ण केले. 

Web Title: Engagement of Mukesh Ambani Son Akash Ambani with Shloka Mehta