VIDEO : कलम 370च्या निर्णयनंतर देशभरात जल्लोष

वृत्तसंस्था
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, हा निर्णय सरकारने शांततेत विचार करून घेतला आहे. 

नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, हा निर्णय सरकारने शांततेत विचार करून घेतला आहे. 

कलम 370च्या निर्णयानंतर देशभरात मात्र मोठ्या प्रमाणावर जल्लोष करण्यात येत आहे. आज (ता.05) जम्मू काश्मीरातील हिंसाचाराच्या जखमा सात दशके वागविणाऱ्या भारताच्या इतिहासाला नवे व एतिहासिक वळण देणारा आजचा दिवस ठरला.

काश्मीरी पंडिताही या निर्णयाचे स्वागत केलेले पाहायला मिळत आहे. तसेच काश्मीर हमारा है असा जयघोष करत लोक रस्त्यावर येऊन फटाके फोडताना आणि पेढे वाटताना दिसत आहेत.

दरम्यान, काश्मीरला अन्य भारतापेक्षा खास दर्जा देणाऱ्या कलम 370 ला हद्दपार करण्याचे आश्वासन भाजपने आपल्या लोकसभा निवडणूक जाहीरनाम्यात दिले होते आणि ते करून दाखवले असल्याच्या प्रतिक्रीया सर्वच स्तरातून उमटत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Enjoying Hole Country after the decision of section 370