अयोध्या प्रकरणाचा अखेरचा युक्तिवाद सुरु; आज कळणार निकालाची तारिख

वृत्तसंस्था
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

सरन्यायाधीशांसह पाच जणांच्या न्यायाधीशांचे खंडपीठ सर्वोच्च न्यायालयात पोहचले आहे. आता अधिक वेळ दिला जाणार नाही. सरन्यायाधीश कुणाचे ऐकणार नाहीत. संध्याकाळी पाचवाजेपर्यंत सुनावणी पूर्ण होणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीनवादा प्रकरणी आज (बुधवार) सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुनावणी पूर्ण होणार आहे. त्यामुळे आज निकालाची तारिख कळणार असल्याचे स्पष्ट आहे.

सरन्यायाधीशांसह पाच जणांच्या न्यायाधीशांचे खंडपीठ सर्वोच्च न्यायालयात पोहचले आहे. आता अधिक वेळ दिला जाणार नाही. सरन्यायाधीश कुणाचे ऐकणार नाहीत. संध्याकाळी पाचवाजेपर्यंत सुनावणी पूर्ण होणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

अयोध्येतील राम मंदिर प्रकरणी आज (बुधवार) सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी याबाबत मंगळवारी संकेत दिले होते. मंगळवारी अयोध्या प्रकरणी सुनावणीचा 39 वा दिवस होता. तसंच सर्व पक्षकारांनी आपला युक्तीवाद बुधवारी पूर्ण करण्याचे आदेशही काल झालेल्या सुनावणीदरम्यान देण्यात आले होते. त्यामुळे आज अंतिम युक्तिवाद केला जाणार आहे. अयोध्येत या पार्श्वभूमीवर कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

विजेत्याच्या भूमिकेतील बाबराने अयोध्येतील राममंदिराच्या जागी मशीद उभारून ऐतिहासिक चूक केली होती, ही चूक आता दुरुस्त करणे गरजेचे असल्याची भूमिका हिंदू पक्षकारांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडली होती. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होत आहे.  या वेळी माजी ऍटर्नी जनरल आणि ज्येष्ठ विधीज्ञ के. पराशरन यांनी हिंदू पक्षकारांची बाजू मांडली. अयोध्येमध्ये आजही खूप साऱ्या मशिदी आहेत, तेथे जाऊन मुस्लिम बांधव प्रार्थना करू शकतात, पण हिंदू मात्र भगवान रामाच्या जन्मस्थळामध्ये बदल करू शकत नाहीत, असेही पराशरन यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. पराशरन हे न्यायालयामध्ये महंत सुरेश दास यांची बाजू मांडत असून सुन्नी वक्‍फ बोर्डाने दाखल केलेल्या खटल्यामध्ये ते प्रतिवादी आहेत. भारत जिंकल्यानंतर बाबराने ऐतिहासिक चूक केली. त्याने राम जन्मभूमीच्या ठिकाणीच मशीद उभारून आपले स्थान कायद्यापेक्षाही मोठे केले, असे पराशरन यांनी नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Enough Is Enough Ayodhya Hearing To End At 5 pm Says Chief Justice