देशात जीवनावश्‍यक वस्तूंचा मुबलक साठा - अमित शहा 

amit-shah
amit-shah

नवी दिल्ली - देशात मुबलक प्रमाणात अन्नधान्य, औषधे तसेच इतर जीवनावश्‍यक वस्तूंचा साठा आहे. त्यामुळे कोणतीही चिंता किंवा घाबरून न जाता नागरिकांनी घरातच सुरक्षित राहावे, असे आवाहन मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील लॉकडाउन 3 मेपर्यंत वाढविल्याची घोषणा केली. यानंतर गृहमंत्री शहा यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली. 

ते म्हणाले, "देशातील सर्व राज्य सरकारे केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार चांगले काम करत आहेत. राज्य सरकारे नागरिकांच्या आवश्‍यक सोयीसुविधांसाठी प्रयत्नशील आहेत. तसेच डॉक्‍टर, परिचारिका, आरोग्य सेवक आणि पोलिसही आपले कर्तव्य अगदी चोखपणे पार पाडत आहेत. या घटकांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. त्यामुळे त्यांच्यावर हल्ले करण्याचे काही कारण नाही.' 

ते पुढे म्हणाले, "या संकटाच्या काळात देशातील नागरिकांनी धैर्याने साथ दिली आहे. प्रत्येक नागरिकाने सरकारच्या सूचनांचे पालक करावे. केंद्र सरकार पूर्ण ताकदीने आणि क्षमतेने कोरोनाचा सामना करण्यासाठी लढत आहे. या लढ्याला लवकरच यश येईल.' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com