हिंसाचारासाठी हुर्रियत नेत्यांना ना 'पाक' मदत

वृत्तसंस्था
शनिवार, 20 मे 2017

नवी दिल्ली - काश्‍मीर खोऱ्यामध्ये हिंसाचार पसरविण्यासाठी हुर्रियतच्या बड्या नेत्यांना पाकिस्तानातील "लष्करे तैयबा', "जमात-उद-दावा' या दहशतवादी संघटनांकडून आर्थिक रसद पुरविली जात असल्याची माहिती उघड झाल्यानंतर राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) आज या प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरू केली. मध्यंतरी एका हिंदी वृत्तवाहिनीने केलेल्या स्टींग ऑपरेशनमध्ये हुर्रियत नेत्यांना दहशतवाद्यांकडून रसद मिळत असल्याचे उघड झाले होते.

हुर्रियतचे बडे नेते सय्यद अली शाह गिलानी, नईम खान, गाझी जावेद बाबा, फारूख अहमद दार ऊर्फ बिट्टा कराटे यांना "एनआयए'कडून चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. "एनआयए'च्या प्राथमिक चौकशी अहवालामध्ये या चारही नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर "एफआयआर' दाखल केला जाऊ शकतो. हुर्रियतच्या फुटीरतावादी कारवायांना लगाम घालण्यासाठी तपास संस्थांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जाते. मागील वर्षीच्या जुलै महिन्यापासून काश्‍मीर खोऱ्यामध्ये आंदोलनाचा वणवा पेटला असून, यामध्ये आतापर्यंत शंभर जणांचा बळी गेला आहे. हे आंदोलन भडकावण्यासाठी हुर्रियतच्या नेत्यांना पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांकडून आर्थिक रसद पुरविल्याचे बोलले जाते.

हाफीज सईदचा पैसा
पाकिस्तानातून ही रक्कम हवालाच्या माध्यमातून हुर्रियत नेत्यांपर्यंत पोचविण्यात आली, "लष्करे तैयबा'चा संस्थापक हाफीज सईदने पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणावर हा निधी दिला. आंदोलकांनी सुरक्षा दलांवर दगडफेक करावी यासाठी त्यांना हुर्रियतकडून पैसे दिले जात होते, असेही स्पष्ट झाले आहे. "एनआयए'चे एक पथक श्रीनगरमध्ये दाखल झाले असून ते लवकरच हुर्रियत नेत्यांची चौकशी करू शकते.

विद्यार्थ्यांना फूस
विद्यार्थ्यांनी रस्त्यांवर उतरून दगडफेक करावी म्हणून त्यांना हुर्रियत नेत्यांकडून सातत्याने चिथावणी दिली जात होती, काश्‍मिरींनी त्यांच्या मुलांना लष्कराच्या शाळांमध्ये पाठवू नये, शालेय शिक्षण घेतल्यास ते धर्म आणि संस्कृतीपासून दूर जातील असा प्रचार या नेत्यांकडून केला जातो आहे. या विखारी प्रचारामध्ये नईम गिलानी हे आघाडीवर आहेत. या विखारी प्रचारामुळेच काश्‍मीर खोऱ्यातील आंदोलन आणखी चिघळल्याचे बोलले जाते.

Web Title: Enquiry by NIA Hurriyat leaders funding from Pakistan