सहा महिन्यांसाठी संपूर्ण नागालॅंड "अशांत' 

वृत्तसंस्था
सोमवार, 1 जुलै 2019

केंद्रीय गृह मंत्रालयाने लष्कराच्या विशेषाधिकार कायद्यांतर्गत (अफ्स्पा) संपूर्ण नागालॅंड राज्याला पुढील सहा महिन्यांसाठी "अशांत' म्हणून जाहीर केले आहे. या कायद्यानुसार, लष्कराच्या जवानांना कोठेही कारवाई करत कोणालाही पूर्वकल्पनेशिवाय अटक करण्याचे अधिकार आहेत. 

नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने लष्कराच्या विशेषाधिकार कायद्यांतर्गत (अफ्स्पा) संपूर्ण नागालॅंड राज्याला पुढील सहा महिन्यांसाठी "अशांत' म्हणून जाहीर केले आहे. या कायद्यानुसार, लष्कराच्या जवानांना कोठेही कारवाई करत कोणालाही पूर्वकल्पनेशिवाय अटक करण्याचे अधिकार आहेत. 

संपूर्ण नागालॅंडमधील परिस्थिती अशांत आणि धोकादायक बनली असल्याने येथे नागरी प्रशासनाच्या जोडीला लष्कराचे बळ वापरणे आवश्‍यक असल्याचे केंद्र सरकारचे मत आहे, असे गृह मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे संपूर्ण नागालॅंड राज्य अशांत घोषित करण्यात येत असून, पुढील सहा महिने "अफ्स्पा' कायदा राज्यभर लागू असेल, असेही निवेदनात म्हटले आहे.

नागालॅंडमध्ये अनेक दशकांपासून हा कायदा अमलात असून, राज्यातील परिस्थिती पाहता या अंमलबजावणीला मुदतवाढ मिळाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Entire Nagaland declared disturbed area for six more months under AFSPA