'ईपीएफओ'मध्ये तब्बल 4 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे उघड

वृत्तसंस्था
बुधवार, 21 मार्च 2018

द्वारका सेक्टर 23 मध्ये झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. भविष्य निर्वाह निधीतून काढण्यात आलेली ही रक्कम देशभरात खासगी क्षेत्रात नोकरीस असणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांची आहे.

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये (ईपीएफओ) तब्बल 4 कोटींचा गैरव्यवहार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. ईपीएफओचा हा गैरव्यवहार दिल्लीतील एका कार्यालयात ऑनलाइन माध्यमातून करण्यात आल्याची बाब उघडकीस आली. भविष्य निर्वाह निधीतून कोट्यवधींची रक्कम काढण्यात आली आहे. 

EPFO

द्वारका सेक्टर 23 मध्ये झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. भविष्य निर्वाह निधीतून काढण्यात आलेली ही रक्कम देशभरात खासगी क्षेत्रात नोकरीस असणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांची आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्या पार्श्वभूमीवर तपास सुरु करण्यात आला असून, या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला ताब्यातही घेण्यात आले आहे. या कर्मचाऱ्याकडे अधिक चौकशी केली जात आहे.

Web Title: EPFO Provident Funds Scam of 4 Crores Exposed