भारतातून कॅन्सर नष्ट करण्यासाठी बिगब्रदर न्यूट्रा केअरचे मोठे पाऊल

neutra-care
neutra-care

स्वर्णसाथी हे गुटखा-सुपारी-तंबाखू खाण्याची व सिगारेट ओढण्याची सवय असणाऱ्यांना व त्यामुळे कॅन्सर व अन्य क्रोनिक आजार होण्याचा धोका असतो. अशांसाठी आवश्यक आधार देण्यास भारतातील सर्वात सुरक्षित, नावीन्यपूर्ण, नैसर्गिक न्यूट्रास्युटिकल उत्पादन आज बिगब्रदर न्यूट्रा केअरने दर्शवले. आणि ओएसएमएफ रुग्णांमध्ये (ओरल कॅन्सरचा प्री-कॅन्सरस टप्पा) करण्यात आलेल्या क्लिनिकल अभ्यासाचा अहवालही जाहीर केला.

बेस्टोकेम फॉर्म्युलेशन्स (आय) लि. या भारतातील एका झपाट्याने वाढत्या आरोग्यसेवा सुविधा समूहाची न्यूट्रास्युटिकल कंपनी असणाऱ्या बिगब्रदर न्यूट्रा केअर प्रा. लि.ने, “कॅन्सर” हा मोठ्या प्रमाणावर आढळणारा आजार व गुटखा-सुपारी-तंबाखू खाल्याने किंवा सिगारेट ओढल्याने प्रामुख्याने माउथ कॅन्सर हा भारतात लोकांच्या आरोग्यासाठी किती धोकायदायक आहे, याची माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. कॅन्सरला कारणीभूत ठरणारे घटकही आरोग्याच्या दृष्टीने घातक असून दैनंदिन जीवनात त्यांच्याशी आपला संपर्क येतो, जसे अन्नपदार्थातील बदलांमुळे निर्माण होणारे कार्सिनोजन्स, प्रदूषके, मायक्रो- ऑरगॅनिझम, आरोग्यास घातक जीवनशैली – यामध्ये प्रक्रियेला केलेल्या पदार्थांचे सेवन समाविष्ट आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जगभर होणाऱ्या मृत्यूंमध्ये कॅन्सर हे दुसरे प्रमुख कारण आहे आणि 2015 मध्ये कॅन्सरमुळे 8.8 दशलक्ष मृत्यू झाले. जगभर 6 पैके 1 मृत्यू कॅन्सरमुळे होतो. सर्व प्रकारच्या कॅन्सरमध्ये, टोबॅको-रिलेटेड कॅन्सरचे (टीआरसी) प्रमाण सर्वाधिक आहे आणि कॅन्सरमुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी 22% मृत्यूंना हा कॅन्सर कारणीभूत असतो,” असे प्रमुख्य वक्ते, डॉ. बेर्न्ड मायकल लोफ्लर, जर्मन फार्माकॉलॉजिस्ट व बायोफिजिसिस्ट यांनी स्पष्ट केले.

जगातील अंदाजे 70% लंग कॅन्सरशी व भारतातील सर्व प्रकारच्या 40% कॅन्सरशी तंबाखूचा संबंध आहे. भारतातील प्रदेश विचारात घेता, टीआरसीचे प्रमाण महाराष्ट्र, गुजरात, गोवा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालसह ईशान्येकडील राज्यांमध्ये अधिक दिसून येते. त्यानंतर उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड व छत्तीसगड यांचा क्रमांक आहे,” असे त्यांनी सांगितले.

स्वर्णसाथीमध्ये अत्यंत प्रभावी असणाऱ्या नैसर्गिक कर्क्युमिनचे गुणधर्म आहेत. कर्क्युमिन हळद व नैसर्गिक लिकोपेनपासून तयार होत असून त्यामध्ये अनेक फायदेशीर गुणधर्म आहेत, त्यामुळे प्रतिकारक्षमता वाढते, कार्सिनोजेन्स, दैनंदिन सूज, मुक्त रॅडिकल्स यांचा सामना करण्यासाठी मदत होते, प्रदूषके, अन्नातील बदल, रसायने व मायक्रो-ऑरगॅनिझम यांपासून संरक्षण मिळते. डॉ. बेर्न्ड यांनी सांगितले, “हळदीचे विविध उपयोगी गुणधर्म बऱ्याच काळापासून आपल्याला माहीत आहेत. अनेक आजारांवर घरगुती उपाय म्हणून हळदीचा वापर केला जातो. कॅन्सरचा प्रतिबंध व उपचार यासाठीही हळदीची मदत होते. परंतु, हळदीमुळे कॅन्सरवर फायदा होण्यासाठी दररोज किमान 2.5 ते 5 टेबलस्पून (tbsp, प्रत्येक tbsp =15gms)हळद खाणे गरजेचे आहे आणि ते प्रत्यक्षात शक्य नाही. कर्युमिनॉइड्सचे (हळद) सेवन करण्याचा बाबतीत आणखी एक तोटा म्हणजे “कर्क्युमिन” हा सक्रिय घटक त्याचे फायदे देण्यासाठी रक्तामध्ये मिसळत नाही. स्वर्णसाथी या उणिवांवर मात करते. त्यासाठी कर्युमिनॉइड्स उपलब्ध
करण्यात आले असून, त्याबरोबर पूर्णतः नैसर्गिक हळदही उपलब्ध आहे.

दररोज पुरेसा डोस घेण्यासाठी केवळ 1-2 सॅशे घेता येऊ स्वर्णसाथीमध्ये सर्व नैसर्गिक सक्रिय घटकांची सांगड घातली आहे. हे घटक अतिशय परिणामकारक कर्क्युमिन-हळद/“हळद” एक्स्ट्रॅक्ट, टॉमेटो एक्स्ट्रॅक्ट (लिकोपेन) व मिरी एक्स्ट्रॅक्ट (पायपेरिन) यापासून बनवले आहेत. यामुळे युवकांना व इतर लोकांनाही गुटखा-सुपारी-तंबाखू खाण्याच्या (कोणत्याही पद्धतीने तंबाखू चघळणे, स्नफिंग, धूम्रपान किंवा कच्ची खाणे) दुष्परिणामांचा व विशेषतः ओरल सब मुकोसिस फायब्रॉसिसचा (माउथ कॅन्सरचा प्री-कॅन्सरस टप्पा) सामना करण्यासाठी मदत होईल, तसेच अन्नातील बदल, केमिकल टॉक्सिन, प्रदूषके, मायक्रो-ऑरगॅनिझम, मुक्त रॅडिकल, कॅन्सरला कारणीभूत ठरणारे घटक यांच्यापासून संरक्षण कवच मिळू शकेल”. ओएसएमएफच्या व्यवस्थापनामध्ये हा आधुनिक उपचारासाठी प्रभावी व सुरक्षित पर्याय ठरू शकतो.

एकदा वापरता येईल अशा सिंगल सॅशेमध्ये 14.95 रुपयांत व 299 रुपयांना खोक्यामध्ये (1x20 सॅशे) उपलब्ध असणारे हे किफायतशीर न्यूट्रास्युटिकल उत्पादन तीन नैसर्गिक घटकांची सांगड घालत असून, हे घटक चांगला फ्लेवर व चव देतात, तसेच निरोगी पर्यायही देतात. हे उत्पादन सर्व वयोगटांतील प्रौढांना वापरता येऊ शकते.

स्वर्णसाथी हे ओएसएमएफ रुग्णांमध्ये (म्हणजे, ओरल कॅन्सरचा प्री-कॅन्सरस टप्पा) व यासंबंधीच्या लक्षणांच्या बाबतीत प्रभावी असल्याचे क्लिनिकली सिद्ध झाले आहे. स्वर्णसाथीवर करण्यात आलेल्या क्लिनिकल चाचणीतून, सूज व अल्सरेशन लक्षणीय कमी झाल्याचे, ओएसएमएफची पुढील वाटचाल रोखली गेल्याचे निदर्शनात आले आहे. तोंडाची हालचा वाढणे या बाबतीत ओरल मुकोसाची हालचाल लक्षणीय वाढली असल्याचे, फायब्रॉसिस काही प्रमाणात कमी झाल्याचे आणि एकंदर प्रतिकारक्षमता सुधारल्याचे व त्यामुळे ओरल मुकोसाची व सबमुकोसाची क्षमता वाढून आजारावर मात करण्यास मदत झाल्याचे आढळले आहे.

वर नमूद केलेल्या परिणामांच्या आधारे, स्वर्णसाथी उपचारामुळे ओरल मुकोसाचे कार्य सुरळित होण्यासाठी मदत होऊ शकते, असे सध्याच्या अभ्यासावरून सांगता येऊ शकते. ओएसएमएफच्या व संबंधित लक्षणांच्या व्यवस्थापनामध्ये ते प्रभावी आहे आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत, तसेच सातत्याने फॉलो-अपही करावा लागणार नाही. ओएसएमएफच्या व्यवस्थापनामध्ये हा आधुनिक उपचारासाठी प्रभावी व सुरक्षित पर्याय ठरू शकतो.

स्वर्णसाथी कार्डिओव्हस्क्युलर, डायजेस्टिव्ह, जीआय हेल्थ, मस्क्युलोस्केलेटल (सांधे, स्नायू, हाडे) हेल्थ यांना पाठिंबा देते व
एकंदर आरोग्याची काळजी घेते. हे सुरक्षित, नवीन व नैसर्गिक न्यूट्रास्युटिकल उत्पादन असून, जगभर पहिल्यांदाच दाखल करण्यात आले आहे. हे उत्पादन सर्व वयोगटांतील प्रौढांना वापरता येऊ शकते. स्वर्णसाथी हा बेस्टोकेम समूहाचा "स्वास्थ्य भारत अंतर्गत वेलनेस उपक्रम असून, तो लाखो लोकांचे जीवन वाचवण्यासाठी, तसेच निरोगी जीवनशैली देण्यासाठी मदत करतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com