मोदींचे 'अच्छे भाषण' की 'अच्छे दिन'?

esakal debate: Narendra Modi's speech
esakal debate: Narendra Modi's speech

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत जोरदार बॅटिंग केली आणि विरोधी पक्षांना जवळपास निष्प्रभ करून टाकले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उपस्थित केलेले मुद्दे मोदी यांनी खोडून काढले. गेल्या दोन वर्षांत सरकारने केलेल्या कामगिरीचा धावता आढावा घेतला. 'सुट-बुट की सरकार' म्हणून पहिल्या वर्षी तयार झालेली इमेज पुसण्याचा प्रयत्न मोदी यांच्या भाषणात प्रत्येक शब्दात दिसत होता. 'मेरी सरकार गरीबोंकी सरकार है...' हे मोदी यांनी ठामपणे सांगितले. त्याआधी आपण स्वतः गरीब घरातून आलो असल्याचे आवर्जून सांगायला ते विसरले नाही. 

अपेक्षेप्रमाणे विरोधी पक्षांना; विशेषतः काँग्रेसला मोदी यांचे भाषण पसंत पडलेले नाही. मोदी भूकंपावर उपहासात्मक बोलले असले तरी राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या सहारा आणि बिर्ला डायरी प्रकरणावर मात्र त्यांनी पुन्हा मौन पाळले, असा आरोप काँग्रेसने केला आहे. पंतप्रधानांचे भाषण उर्मटपणाचे असल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेस नेते शशी थरूर म्हणाले आहे, की "अच्छे भाषण' म्हणजे "अच्छे दिन नव्हे.' 

पंतप्रधान मोदी यांनी नेमके कसे भाषण केले म्हणजे काँग्रेसचे समाधान होणार आहे, याबद्दल काँग्रेसने काही स्पष्टीकरण केलेले नाही. गेल्या अडिच वर्षांच्या कारभारात भाजप सरकारने देशभरातील भ्रष्टाचाराला कितपत आळा घातला याबद्दल दुमत असू शकेल; मात्र काँग्रेस सरकारच्या काळापेक्षा मंत्रीपातळीवर भ्रष्टाचार निश्चित कमी आहे, ही जनमानसातील भावना काँग्रेस कशी बदलवणार?

मोदींच्या संसदेतील भाषणाबद्दल मतदार म्हणून आपल्याला काय वाटते? 

  • प्रतिक्रियांमध्ये आवर्जून लिहा...
  • मतचाचणीत आपले मत नोंदवा...
  • सविस्तर प्रतिक्रिया webeditor@esakal.com वर ई मेल करा. Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • सकाळ संवाद मोबाईल अॅप डाऊनलोड करा आणि आमच्यापर्यंत आपले मत ऑडिओ-व्हिडिओद्वारे पोहोचवा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com