राष्ट्रध्वजाचा अवमान; विधानसभेत गदारोळ: ईश्वरप्पांवर कारवाई नाही

काँग्रेसने ईश्वरप्पा यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली.
CM Basavaraj Bommai
CM Basavaraj BommaiEsakal

बंगळूर : राष्ट्रध्वजाच्या कथित अपमानावरून काँग्रेस (Congress)आणि भाजपच्या सदस्यांमध्ये झालेल्या जोरदार वादावादीनंतर कर्नाटक विधानसभेचे कामकाज बुधवारी (ता. १६) अध्यक्षांना गुरुवारपर्यंत (ता. १७) तहकूब करावे लागले. यावेळी ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्री के. एस. ईश्वरप्पा आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यात जोरदार वादावादी झाली. काँग्रेसने ईश्वरप्पा (Eshwarappa) यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, विरोधी पक्ष म्हणून काम करण्यात काँग्रेस अयशस्वी ठरले आहेत. ते राज्यातील आणि विधानसभेतील जनतेची दिशाभूल करत आहेत. कायदेशीरदृष्ट्या ईश्वरप्पा यांनी कोणतीही चूक केलेली नाही आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ शकत नाही असे बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Summary

राष्ट्रध्वजाच्या कथित अपमानावरून काँग्रेस आणि भाजपच्या सदस्यांमध्ये झालेल्या जोरदार वादावादीनंतर कर्नाटक विधानसभेचे कामकाज ) तहकूब करावे लागले.

ते (भाजप) लाल किल्ल्यावर भगवा ध्वज फडकावतील’, अशा ईश्वरप्पा यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या विधानावरून काँग्रेसने यांच्या विरोधात स्थगन प्रस्तावाची मागणी केल्याने गोंधळाची सुरुवात झाली. मंत्र्यांचे विधान राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, 1971 आणि भारतीय दंड संहितेचे उल्लंघन करणारे आहे. लाल किल्ल्यावर नेहमीच राष्ट्रध्वज असतो. तिरंग्याच्या जागी भगवा ध्वज लावण्यात येईल, असे ईश्वरप्पा यांचे विधान देशद्रोहीच म्हणावे लागेल. ईश्वरप्पा यांच्या वक्तव्याला सहा दिवस झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी स्वत:हून कारवाई करून ईश्वरप्पा यांचा राजीनामा आत्तापर्यंत घ्यायला हवा होता, असे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या म्हणाले.

CM Basavaraj Bommai
Karnataka Hijab Controversy : कॉलेज 16 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार

यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी मंत्र्यांचा बचाव केल्याने गदारोळ झाला. काँग्रेसचे सदस्य हातात राष्ट्रध्वज घेऊन सभाध्यक्षांच्या आसनासमोरील वेलमध्ये गेले व ईश्वरप्पा यांना बडतर्फ करण्याची मागणीसाठी त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले. कायदा आणि संसदीय मंत्री जे. सी. मधुस्वामी म्हणाले की, ‘ईश्वरप्पा यांनी लाल किल्ल्यावर भगवा ध्वज फडकवण्याचा उल्लेख करणे हा माध्यमांशी संवादाचा एक भाग होता आणि त्यामुळे त्यांचे विधान म्हणून अर्थ लावता येत नाही. शेवटी त्यांनी असेही म्हटले आहे, की देशाने तिरंगा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारला आहे आणि प्रत्येकाने त्याचा आदर केला पाहिजे. त्यामुळे देशद्रोहाचा प्रश्नच उद्भवत नाही.’

दरम्यान, सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी म्हणाले की, स्थगन प्रस्तावाला परवानगी द्यायची की नाही याचा निर्णय घेण्यापूर्वी त्यांना ईश्वरप्पा यांचे समर्थन ऐकायचे आहे. आंदोलनासाठी राष्ट्रध्वजाचा वापर करणे योग्य नसल्याचे सांगून सभाध्यक्षांनी कॉंग्रेस सदस्यांच्या वर्तनाबद्दल खेद व्यक्त केला. यावेळी शिवकुमार यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी ईश्वरप्पा यांच्या वक्तव्याचा निषेध केला आणि प्रथम सरकारच्या अधिकृत उत्तराची मागणी केली. संतापलेल्या ईश्वरप्पा यांनी शिवकुमार यांच्यावर वैयक्तिक टीका केली. यामुळे संतापलेल्या शिवकुमार यांनी सभागृहाच्या वेलकडे धाव घेतली आणि नंतर मंत्र्यांच्या आसनाकडे जाण्याचा प्रयत्न केला. दोन्ही पक्षांचे सदस्य हातवारे करताना दिसल्यानंतर त्यांना नियंत्रित करण्यासाठी मार्शलना यावे लागले. त्यानंतर सभापतींनी उद्यापर्यंत सभागृह तहकूब केले. सभागृहातून पांगण्यापूर्वी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही नेत्यांमध्ये या मुद्द्यावरून शाब्दिक चकमक उडाली. दरम्यान, गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र म्हणाले की, हिजाबच्या वादामध्ये काँग्रेसने आपले युक्तिवाद गमावले आहेत आणि म्हणूनच ते असे मुद्दे उपस्थित करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com