दिल्लीत आजपासून 'युरो 6' इंधन 

वृत्तसंस्था
रविवार, 1 एप्रिल 2018

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील वाढत्या वायू प्रदूषणाचा धोका पाहता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या युरो 6 इंधनाची विक्री उद्यापासून होणार आहे. विशेष म्हणजे या इंधनाला कोणतेही अतिरिक्त भुर्दंड ग्राहकांना सोसावा लागणार नाही. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम या तेलकंपन्या या इंधनाची विक्री करणार आहेत. 

राजधानी परिसरातील शहरांमध्ये (नोएडा, गाझियाबाद, गुरूग्राम, फरिदाबाद) याचसह मुंबई, चेन्नई, बंगळूरू, हैदराबाद व पुणे यासह देशातील 13 प्रमुख शहरांमध्ये युरो 6 दर्जाचे इंधन सुरू करण्यात येणार आहे. देशातील इतर भागांमध्ये एप्रिल 2020 मध्ये या नियमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 

पेट्रोल मालक कंपन्या उद्यापासून तेलकंपन्या दिल्लीतील 391 पेट्रोल पंपांवर बीएस 6 (युरो-6 सदृश इंधन) इंधनाची विक्री करणार आहेत, अशी माहिती इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे संचालक (तेलशुद्धीकरण) बी. व्ही. राम गोपाल यांनी दिली. स्वच्छ इंधनावर तेल कंपन्या गुंतवणूक करत असून त्याची भरपाई ग्राहकांकडून करण्याचे कोणतेही नियोजन नाही, असेही रामा म्हणाले. किंमतीचा विचार करता स्वच्छ इंधनावर कंपन्यांचे प्रतिलीटर 50 पैसे अधिक खर्च होणार आहेत. ज्या वेळी पूर्ण देशामध्ये युरो 6 दर्जाची इंधन विक्री होईल, तेव्हा गुंतवणुकीच्या पुनर्प्राप्तीचे नियोजन करण्यात येईल, असे रामा म्हणाले. 

देशातील मथुरा (उत्तर प्रदेश), पानिपत (हरयाणा), बिना (मध्य प्रदेश) येथील तेलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये 9.6 लाख टन पेट्रोल व 12.65 लाख टन डिझेलचे शुद्धीकरण करण्यात आले असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. एकट्या पानिपत येथील तेलशुद्धीकरण प्रकल्पात 183 कोटी रुपये इंधन शुद्धीकरणासाठी वापरण्यात आलेले आहेत. 

इंधनामधील फरक 
घटक........युरो 2...............युरो 4................युरो 6 
सल्फर......500 पीपीएम......50 पीपीएम...........10 पीपीएम 

Web Title: Euro 6 fuel will be used in Delhi to counter air pollution