युरोपला सहलीला जायचे आहे, तर मग हे वाचाच!

पीटीआय
गुरुवार, 16 जानेवारी 2020

आर्थिक बाजू भक्कम करणार
जगभरातील परराष्ट्र वकिलातींचे कामकाज सुरळीत चालावे, ‘आयटी’ यंत्रणांचे आधुनिकीकरण आणि व्हिसाची प्रक्रिया सुलभ आणि वेगाने होण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध व्हावा, या हेतूने ही वाढ करण्यात आली आहे. यामुळे स्थलांतरातील अनियमितता रोखण्यासाठी सुरक्षेत वाढ करणे शक्‍य होणार आहे, असे या प्रवक्‍त्याने सांगितले.

नवी दिल्ली - विदेशात फिरण्यासाठी जाणाऱ्या बहुतांश भारतीय पर्यटकांची पसंती युरोपला असते. मात्र, युरोपची सहल आता महागात पडणार आहे. युरोपातील अनेक देशांत प्रवेशासाठी आवश्‍यक असलेल्या शेंगेन व्हिसाचे शुल्क पुढील महिन्यापासून वाढणार आहे. सध्या शेंगेन व्हिसासाठी ६० युरो शुल्क आहे. त्यात वाढ होऊन ते ८० युरो होणार आहे. शुल्कवाढ दोन फेब्रुवारीपासून लागू होणार असल्याची माहिती युरोपिअन आयोगाच्या प्रवक्‍त्याने दिली. आजचा दर एक युरोला ७८.९३ पैसे होता.Image result for europe

Image result for europe tourist

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शेंगेन व्हिसा

  • युरोपातील ऑस्ट्रिया, डेन्मार्क, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, स्वित्झर्लंड आणि स्पेनसह २६ देशांमध्ये आवश्‍यक
  • भारतासह अन्य सर्व देशांच्या नागरिकांसाठी शुल्कवाढ लागू
  • ज्या देशांचा युरोपीय समुदायाशी व्हिसा करार झाले आहे, त्यांना सूट
  • सहा ते १२ वर्षे वयोगटातील मुलांच्या व्हिसासाठी ३५ ऐवजी ४० युरो शुल्क
  • नवजात बालक आणि सहा वर्षांखालील मुलांसाठी शुल्कवाढ लागू नाही
  • शेंगेन व्हिसाच्या अर्जाच्या शुल्कात २००६पासून बदल झालेला नाही

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Europes trip will be expensive