देशात दररोज ६ नागरिकांचा कोठडीत मृत्यू; महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Every day 6 citizens die in custody in the country

NHRC Report : देशात दररोज ६ नागरिकांचा कोठडीत मृत्यू; महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

भारतातील पोलिस सुधारणांबाबत अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेदरम्यान एक आकडा प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार भारतात दररोज ६ नागरिकांचा पोलिस कोठडीत (custody) मृत्यू (die) होतो. केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा (NHRC) डेटा लोकसभेत सादर केला. ज्यामध्ये एका वर्षात पोलिस कोठडीत किती लोकांचा मृत्यू झाला हे सांगण्यात आले. (Every day 6 citizens die in custody in the country)

NHRC च्या अहवालानुसार, २०२१-२२ (फेब्रुवारीपर्यंत) २,१५२ लोकांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. तसेच १५५ लोकांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. याचा अर्थ कोठडीत दररोज ६ जणांचा मृत्यू होत आहे. न्यायालयीन कोठडीत मृत्यूच्या बाबतीत उत्तर प्रदेश आघाडीवर आहे. येथे ४४८ लोकांचा न्यायालयीन कोठडीत (custody) मृत्यू झाला. त्याचबरोबर महाराष्ट्रात सर्वाधिक १२९ जणांचा पोलिस कोठडीत मृत्यू (die) झाला आहे. छळविरोधी राष्ट्रीय मोहिमेच्या अहवालानुसार, २०१९ च्या आकडेवारीची तुलना केली असता २०१९ मध्ये दररोज ५ लोकांचा कोठडीत मृत्यू झाला.

हेही वाचा: Nagpur : एक, दोन नव्हे तर तब्बल ४० सिलिंडरचा स्फोट; टिनाचे पत्रे वितळले

कोठडीतील (custody) मृत्यूंपैकी केवळ १,१८४ प्रकरणांमध्ये भरपाईची शिफारस करण्यात आली आहे. तसेच केवळ २१ प्रकरणांमध्ये शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. २०१६ ते २०२२ दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये न्यायालयीन कोठडीत सर्वाधिक २,५२८ मृत्यू (die) झाले आहेत. NHRC च्या अहवालानुसार देशात दररोज ६ लोकांचा कोठडीत मृत्यू होतो. यात उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे.

न्यायालयीन कोठडीतील मृत्यू

वर्ष मृत्यू

२०२०-२१ १,८४०

२०१९-२० १,५८४

२०१८-१९ १,७९७

२०१७-१८ १,६३६

२०१६-१७ १६१६

हेही वाचा: नवविवाहित सुनेने खासदारांना आशीर्वादात मागितला चक्क रस्ता

पोलिस कोठडीतील मृत्यू

वर्ष मृत्यू

२०२०-२१ १००

२०१९-२० ११२

२०१८-१९ १३६

२०१७-१८ १४६

२०१६-१७ १४५

२०१६ ते २०२२ ११,४१९

Web Title: Every Day 6 Citizens Die In Custody In The Country Nhrc Report Maharashtra Ranks Second

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top