प्रत्येक निर्णयात भाजप आमच्यासोबत : मेहबूबा मुफ्ती

वृत्तसंस्था
रविवार, 24 जून 2018

''जम्मू आणि लडाखमधील भेदभावाचा आरोप चुकीचा असून, पीडीपी-भाजपच्या सरकारमध्ये प्रत्येक निर्णयात भाजपदेखील आमच्यासोबत होती''. 

-  मेहबूबा मुफ्ती, अध्यक्षा, पीडीपी

जम्मू : लडाख आणि जम्मूमध्ये भेदभाव करण्यात येत असल्याचा आरोप केला जात आहे. हा आरोप चुकीचा असून, काश्मीर खोऱ्यात अधिक लक्ष देणे गरजेचे होते. मात्र, जर येथे भेदभाव केला जात होता. तर पहिल्यांदा केंद्र आणि राज्यासमोर हा मुद्दा का मांडण्यात आला नाही, असा सवाल उपस्थित करत सरकारच्या सर्व निर्णयांमध्ये भाजपचे समर्थन होते, असे स्पष्टीकरण पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या (पीडीपी) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी दिले.

जम्मू आणि लडाखमध्ये भेदभाव केला जात असून, काश्मीरी नागरिकांना दिलेली आश्वासने मुफ्ती सरकारने पूर्ण केली नाहीत, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला होता. या आरोपाला प्रत्युत्तर देताना मुफ्ती म्हणाल्या, जम्मू आणि लडाखमधील भेदभावाचा आरोप चुकीचा असून, पीडीपी-भाजपच्या सरकारमध्ये प्रत्येक निर्णयात भाजपदेखील आमच्यासोबत होती. 

तसेच मुफ्ती पुढे म्हणाल्या, आमच्या माजी सहकारी पक्षाने आमच्यावर चुकीचे आरोप केले आहेत. आम्ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून तयार करण्यात आलेल्या युतीबाबत कार्यप्रणाली कधीही तुटू दिली नाही.

Web Title: In Every Decision BJP was with us says Mehbooba Mufti

टॅग्स