प्रत्येक मुलीचा सन्मान व्हायला हवा : पंतप्रधान

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 मे 2018

मुलगी हिंदू, मुस्लिम किंवा ख्रिश्चन समाजातील असो, मुलगी ही मुलगी असते. तिचा सन्मान व्हायला हवा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

विजयपुरा : मुलगी हिंदू, मुस्लिम किंवा ख्रिश्चन समाजातील असो, मुलगी ही मुलगी असते. तिचा सन्मान व्हायला हवा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या दृष्टीने केंद्र सरकार प्रयत्न करत असून, द्राक्षाला योग्य भाव मिळावा यासाठी योग्य ती पावले केंद्र सरकारकडून उचलली जात आहेत. तसेच 'अटल पेन्शन योजनेंतर्गत' देशातील एक कोटी ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळाला, असेही ते म्हणाले. 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजयपुरा येथे आयोजित प्रचाससभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. ते म्हणाले, देशातील मध्यमवर्गीय जनतेसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री विमा योजनेंतर्गत 90 पैशांमध्ये विमा योजना आणली. या योजनेचा लाभ देशातील 19 कोटी जनतेने घेतला. यातील लाभार्थ्यांना 2 लाखांचा निधी मिळणार आहे. तसेच अटल पेन्शन योजनेंतर्गत देशातील एक कोटी ज्येष्ठ नागरिक लाभार्थी बनले आहेत. केंद्र सरकारच्या 'आयुष्यमान भारत' या योजनेंतर्गत देशातील गरिब, मध्यमवर्गीय जनतेला 5 लाखांपर्यंत याचा फायदा मिळणार आहे.  

PM Modi

शेतकऱ्यांच्या दृष्टीने केंद्र सरकार प्रयत्न करत असून, द्राक्षाला योग्य भाव मिळावा यासाठी योग्य ती पावले केंद्र सरकारकडून उचलली जात आहेत. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून भगवान बसवेश्वरांचे विचार जगभरात पसरवले जात आहेत. जीएसटीमुळे तीन दिवसांत जाणारी गाडी एका दिवसात जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होत आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी तिहेरी तलाकच्या मुद्यावरून काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ''काँग्रेस पक्ष तिहेरी तलाकचा कायदा संमत करण्याची परवानगी देत नाही. त्यामुळे काँग्रेस महिला सबलीकरणाबाबत कसे काय बोलत आहे, असा सवालही मोदींनी यावेळी केला. 

Web Title: Every girl should be respected says PM Modi