प्रत्येक भारतीय काश्मीरवर प्रेम करतो- पंतप्रधान

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 ऑगस्ट 2016

नवी दिल्ली- प्रत्येक भारतीय हा काश्मीरवर प्रेम करत असून, प्रत्येक भारतीयाची काश्मीरला जायची इच्छा आहे. विकासाच्या माध्यमातून आम्ही काश्मीर मुद्याचे समाधान शोधत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) म्हटले आहे.

मध्यप्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या रॅलीदरम्यान मोदी बोलत होते. मोदी म्हणाले, ‘प्रत्येक भारतीय काश्मीरवर प्रेम असून प्रत्येक भारतीयाची काश्मीरला जायची इच्छा आहे. काश्मीरसह भारतातील प्रत्येकाला स्वातंत्र असून, काश्मीरी युवकांचे आयुष्य प्रकाशमय करायचे आहे, काश्मीरमधील युवकांच्या हातात दगडांऐवजी लॅपटॉप अथवा क्रिकेटची बॅट असावी. जम्मू-काश्मीरमध्ये आम्हालाही बदल हवा आहे. काश्मीरी नागरिकांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार तयार आहे. प्रत्येक समस्येवर आम्ही तोडगा शोधत आहोत.‘

‘जम्मू-काश्मीरमध्ये काहीजण दिशाभूल करून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, सरकार वातावरण शांत करत आहे. कोणताही विषय हा चर्चेने सुटू शकतो,‘ असेही मोदी म्हणाले.

Web Title: Every Indian Kashmir love : Prime Minister