माझ्यासाठी प्रत्येक दिवस अवघड, म्हणत संपविले जीवन

वृत्तसंस्था
रविवार, 3 फेब्रुवारी 2019

नवी दिल्ली : एका 21 वर्षीय आयआयटीच्या विद्यार्थ्याने हॉटेलच्या 7 व्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केली. संबंधित विद्यार्थी हैदराबाद येथील आयआयटीचे शिक्षण घेत होता. आत्महत्येपूर्वी त्याने आपल्या 'मित्राला प्रत्येक दिवस अवघड बनतोय', असा मेल केला होता. त्यानंतर त्याने आत्महत्या केली.  

अनिरुद्ध असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या विद्यार्थ्याने आत्महत्येपूर्वी आपल्या मित्राला ई-मेल करून याबाबतची माहिती दिली होती. यामध्ये त्याने सांगितले, की मी तणावातून माझे जीवन संपवत आहे. माझा हा निर्णय पूर्णपणे तात्विक असून, माझ्या पुढील भविष्याच्या घडामोडींबाबत हा निर्णय आहे. आता जगण्यामध्ये कोणतीही सांशकता नाही. आता दैनंदिन जीवन अत्यंत अवघड होत चालले आहे, असे त्याने ई-मेलमध्ये म्हटले होते. 

दरम्यान, अनिरुद्धला काही दिवसांपूर्वी मानसोपचारतज्ज्ञाकडे नेण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. 
 
Web Title: everyday is becoming more difficult IIT Hyderabad student wrote to his friends before suicide